Pahalgam terror attack: पहलगाम (Pahalgam)येथील बैसरन खोऱ्यामधील दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास एजन्सीकडून (NIA) सुरू आहे. एनआयएच्या हाती तपासाच्यादृष्टीने महत्त्वाचा पुरावा आणि साक्षीदार मिळाला आहे. दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करत असल्याचा संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण झालेले आहे. त्यामुळे तपासाच्यादृष्टीने एनआयएच्या हाती महत्त्वाचा पुरावी हाती मिळालेला आहे. तसेच दहशतवाद्यांकडे असलेल्या शस्त्रे हे पाकिस्तानमधील असल्याचे समोर येत आहे. याबाबत अनेक इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी वृत्त दिलेले आहे.
…तर युद्धासाठी तयार राहा, घौरी, शाहीन हे काय फक्त प्रदर्शनासाठी नाहीत; पाकिस्तानी मंत्र्यांची धमकी
बैसरन खोऱ्यामध्ये आलेल्या पर्यटकांचे व्हिडिओ काढण्याचे काम स्थानिक व्हिडिओग्राफर करतो. हा व्हिडिओग्राफर हा आपले काम करत असताना अचानक गोळीबार करतो. हा व्हिडिओ जीव वाचविण्यासाठी पळून एका झाडावर चढून बसतो. त्याचवेळी आपल्या कॅमेऱ्यामधून गोळीबाराचे शूटिंग तो करत होता. हा महत्त्वाचा पुरावा एनआयएला मिळालेला आहे. व्हिडिओग्राफर आणि त्याच्याकडील व्हिडिओवरून पर्यटकांवर हल्ला कसा झाले याचा घटनाक्रमही समोर येत आहे.
मोदींनी दिलेली मुदत संपली, मायदेशी परतण्यासाठी पाक नागरिकांची तारांबळ, सीमेवर रांगाच रांगा…
चार दहशतवाद्यांनी कसा हल्ला केला ?
पहलगावमधील पर्यटकांवर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. चार दहशतवादी दोन गटात विभागले होते. दोघे जण एका झुडपाच्या बाजूला लपलेले होते. तर स्नॅकशॉपच्या बाजूला दोघे आले. दहशतवादी हे लष्करी गणवेशात असल्याने पर्यटकांना किंवा दुकानदारांना संशय आला नाहीत. त्याचवेळेस नाष्टा करत असलेल्या पर्यटकांना त्यांचे नावे आणि धर्म विचारला. काहींना कलमा म्हणण्यास सांगितले. त्यानंतर दहशतवाद्यांनी पुरुषांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर पर्यटक हे आरडाओरडा करून जीव वाचविण्याच्या आकांतने पळत सुटले आहे. त्यानंतर झुडपाच्या बाजूला लपलेले दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करत अनेकांना ठार केले, असा घटनाक्रम तपासात समोर येत आहे.
दहशतवाद्यांनी दोघांचे मोबाईल हिसकावून नेले
दहशवाद्यांनी हल्ल्यानंतर एका पर्यटकाचा आणि स्थानिक नागरिकांचे दोन मोबाईल हिसकावून नेले. एजन्सी दोन्ही फोन ट्रॅक करत आहेत. यामुळे दहशतवाद्यांच्या सध्याच्या स्थानाबद्दल किंवा हालचालींबद्दल महत्त्वाचे पुरावे मिळू शकता. पण घटनेपासून फोन बंद आहेत.
एक 47 आणि एम 4 रायफल्सचे रिकामे काडतुसे जप्त
एनआयएने एके-47 आणि एम 4 रायफल्सचे रिकामे काडतुसे जप्त केलीय. अफगाण युद्ध संपल्यापासून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी एम 4 वापरले आहेत. म्हणजे हे शस्त्र पाकिस्तानचे असल्याचे असे गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चार दहशतवाद्यांपैकी किमान एक स्थानिक आदिल हुसैन ठोकर हा होता. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या कागदपत्रांनुसार ठोकर कट्टरपंथी झाला होता आणि 2018 मध्ये हिजबुल मुजाहिदीनमध्ये सामील झाला होता. तो वैध कागदपत्रांवर पाकिस्तानात गेला होता. त्यानंतर हिजबुल मुजाहिदीन सोडून लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता. ठोकरने त्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांना रसद पुरवण्यास मदत केली आणि इतर दहशतवादी हल्ल्यांमध्ये गाइड म्हणूनही काम केले असा आरोप आहे.