Threat to blow up Narendra Modi Stadium : पाकिस्तानने अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमला (Narendra Modi Stadium) बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलीय. ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) भारत-पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यात युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झालीये. अशातच पाकिस्तानने धमकी दिली.त्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Video : दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, पहलगाम हल्ल्याचा बदला कसा घेतला? लष्करानं केले शेअर व्हिडिओ…
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी नेता मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांसह अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येतंय. या पार्श्वभूमीवर, गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानकडून आलेल्या या ईमेलमध्ये आम्ही तुमच्या स्टेडियमला उडवून देऊ, असं लिहिलंय. या धमकीनंतर सुरक्षा एजन्सींनी तपास सुरू केलाय आणि अहमदाबादमधील स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
पिक्चर अभी बाकी है! अर्धसैनिक दलांच्या सुट्ट्या रद्द; हाय अलर्ट जारी, अमित शाहांचे आदेश काय?
गुजरात क्रिकेट असोसिएशनला पाकिस्तानकडून हा धमकीचा मेल आलाय. याबाबत जीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्टेडियमच्या सुरक्षा रक्षकांना याबद्दल सतर्क करण्यात आलंय. सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्कतेने काम सुरू ठेवलंय. गुजरात पोलिस आणि सायबर क्राईम टीमकडून ईमेलच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियम हे आयपीएल २०२५ साठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे १४ मे आणि १८ मे रोजी गुजरात टायटन्स आणि इतर संघांमध्ये सामने खेळले जाणार आहेत.
दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त
भारताने पाकिस्तानात १०० किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळे उद्ध्वस्त केले. भारताने मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर मोठा हल्ला केला. दहशतवाद्यांचे नऊ तळे उद्धवस्त करून ऑपरेशन सिंदर ही मोहिम फत्ते केली.
गृहमंत्री शाहांचे निमलष्करी दलांना निर्देश
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती वेगाने बदलत आहे. हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यानंतर, बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफसह सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्यात. सर्व सैनिकांनी दक्षतेने कर्तव्यावर उपस्थित राहावे आणि सीमावर्ती भागात जास्तीत जास्त उपस्थिती राखावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेत.