Download App

भारतीय हवाई हल्ल्यानंतर… पाकिस्तानी शेअर बाजारात मोठा भूकंप, 6000 अंकांनी कोसळला

Pakistani Share Market Crashed Due To Indian Air Strike : भारताच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या (Pakistan) शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा बेंचमार्क कराची स्टॉक एक्सचेंज कोसळला (Indian Air Strike) आहे. मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यामध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात (Pakistani Share Market) केले. 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लष्कराने ही कारवाई केली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा केएसई-100 निर्देशांक सुमारे 5 टक्क्यांनी घसरला आहे. कराची स्टॉक एक्सचेंज-100 निर्देशांक 4.62 टक्क्यांनी घसरून 1,07,296 वर बंद झाला.

दुसरीकडे, भारतीय शेअर बाजारात (Share Market) तेजी दिसून येत आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता, बीएसई सेन्सेक्स 0.13 टक्के म्हणजेच 105 अंकांच्या वाढीसह 80,746 वर व्यवहार करताना दिसला. एनएसई निफ्टी 0.19 टक्के म्हणजेच 46.30 अंकांच्या वाढीसह 24,425 वर व्यवहार करताना दिसला. भारताच्या हवाई हल्ल्याने गुंतवणूकदार खूश असल्याचे दिसून येत आहे. बाजारावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.

यापुढे कोणाची हिंमत होणार नाही… एअर स्ट्राईकवर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय की, भारताने विशेष शस्त्रांचा वापर करून पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे. बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट ही प्रमुख ठिकाणे होती. हे ऑपरेशन लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या एकत्रित प्रयत्नांनी पार पाडण्यात आले आहे. भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांची योजना आखण्यासाठी आणि निर्देशित करण्यासाठी या लपण्याच्या ठिकाणांचा वापर केला जात होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Video : अचूक ऑपरेशन अन् हनुमानाचा आदर्श; ऑपरेशन सिंदूरबाबत राजनाथ सिंह काय म्हणाले?

संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते की, काही काळापूर्वीच भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले जात होते आणि त्यांचे निर्देश दिले जात होते. भारतीय हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानी शेअर बाजार हादरला आहे. तो थेट 6000 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण आहे.

 

follow us