Download App

विनेश फोगट अपात्र ठरताच मोदी मैदानात; तू तर भारताचा अभिमान म्हणत वाढवला आत्मविश्वास

पॅरिस ऑलिम्पिक महिला कुस्तीच्या अंतिम फेरीसाठी विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर आता त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली आहे.

  • Written By: Last Updated:

PM Modi Post On X After Vinesh Phogat Disqualified :  पॅरिस ऑलिम्पिक महिला कुस्तीच्या अंतिम फेरीसाठी विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर आता त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली असून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) यावर ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी अपात्र ठरलेल्या विनेशचा आत्मविश्वास वाढावा असा संदेश लिहिला आहे.

काय म्हणाले मोदी?

विनेश, चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन असून, भारताचा अभिमान आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजचा धक्का मनाला वेदना देऊन गेला. या सर्वातून अनुभवत असलेली निराशेची भावना शब्दांत व्यक्त करावी असे मोदींनी म्हटले आहे. आव्हाने स्वीकारणे हा तुझा नेहमीच स्वभाव राहिला आहे. त्यामुळे मजबूत विश्वासाने परत या! आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत असे मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

विनेशला एक चूक पडली महागात

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगटला (Vinesh Phogat) वजन जास्त असल्याने अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.6) तिने उपांत्य फेरीत क्युबाच्या लोपेझ गुझमनचा 5-0 असा पराभव केला होता.  महिला कुस्तीत ऑलिम्पिकच्या (Paris  Olympic) अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती. रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे.

Vinesh Phogat: नखं कापली केस कापली अन् रक्तसुद्धा काढलं; मात्र, वजन प्रकारात विनेशची हार

अंतिम फेरीत अमेरिकन कुस्तीपटूशी होणार होता सामना

उपांत्य फेरीत क्युबाच्या लोपेझ गुझमनचा 5-0 असा पराभव केल्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटा समाना अमेरिकन कुस्तीपटूशी होणार होता. ज्या कुस्तीपटूशी विनेशचा अंतिम सामना होणार होणार होता. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकेही जिंकली आहेत. हा सामना रात्री 12.30 वाजता (8 ऑगस्ट) उशिरा खेळला जाणार होता. मात्र, आता वजन वाढल्याने भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले आहे.

Vinesh Phogat प्रकरणाचे संसदेत पडसाद; विरोधकांचा लोकसभेत जोरदार गदारोळ

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने काय अपडेट दिले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिक्रियेपूर्वी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने विनेश फोगटच्या संदर्भात दिलेल्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, “संघाने रात्रभर सर्वोतोपरी प्रयत्न करूनही, आज सकाळी विनेश फोगटचे वजन काही ग्रॅम ५० किलोपेक्षा जास्त होते. या सर्व प्रकरणात संघ काहीही करणार नसून, भारतीय संघ विनेश फोगटच्या गोपनीयतेचा आदर करू इच्छित असल्याचे म्हटले आहे.

follow us