Download App

Video : राम मंदिराचा उल्लेख, जोरदार टाळ्यांचा कडकडाट अन् मूर्मूंना घ्यावा लागला भाषणात भलामोठ्ठा पॉज

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. त्यापूर्वी देशाच्या राष्ट्रपती दौप्रदी मूर्मू (Draupdi Murmu) यांनी संसद सदस्यांना संबोधित केले. मूर्मू यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या गोष्टींचा आणि निर्णयांचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. मात्र, भाषणात नुकत्याच उद्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख आला आणि संपूर्ण सभागृहात नॉनस्टॉप टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांचा हा आवाज इतका होता की, तो थांबेपर्यंत मूर्मू यांना त्यांचे भाषण काही काळासाठी थांबवावे लागले.

http://परिक्षेतील गैरव्यवहारांना चाप बसणार; मोदी सरकार याच अधिवेशनात आणणार नवा कायदा!

अभिभाषणात काय म्हणाल्या मूर्मू

अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सदस्यांना संबोधित करताना मूर्मू यांनी संसदेशी नवीन वास्तू अमृतकाळाच्या सुरुवातीला बांधली गेल्याचा उल्लेख केला. या वास्तूत एक भारत, श्रेष्ठ भारताचा वास असल्याचे त्या म्हणाल्या. ही नवीन इमारत धोरणांची पूर्तता करेल, असा विश्वासही यावेळी मूर्मू यांनी व्यक्त केला. यानंतर राष्ट्रपतींनी राम मंदिराचाही उल्लेख केला असता संसदेत उपस्थित सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणारा टाळ्यांचा कडकडाट इतका जास्त होता की, मूर्मू यांना त्यांचे भाषण काही मिनिटांसाठी थांबवावे लागले. या दरम्यान अनेक सदस्यांनी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या. राम मंदिराची निर्मिती अनेक शतकांपासूनची आकांक्षा होती. आज ही सत्यात उतरल्याचे मूर्मू म्हणाल्या.

http://मराठा आरक्षणाची ‘लढाई’ पुन्हा न्यायालयात : ‘सगेसोयरे’ अधिसुचनेला ओबीसी संघटनेकडून आव्हान

मूर्मू यांचे हे वाक्य ऐकताच सत्ताधारी सदस्यांसह पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मंत्र्यांनीही सभागृहाच्या टेबल वाजवण्यास सुरूवात केली. तर काही सदस्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. आपण सर्वजण लहानपणापासून गरीबी हटवण्याचा नारा ऐकत आलो आहोत पण, आता मोदी सरकारच्या काळात आपण मोठ्या प्रमाणावर गरिबी हटवताना पाहत आहोत. NITI आयोगानुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात सुमारे 25 कोटी देशवासी गरीबीतून बाहेर आल्याचे मूर्मू यांनी सांगितले.

follow us