Parliament Monsoon Session : मणिपूर हिंसाचार आणि महिलांच्या व्हिडिओ प्रकरणावरुन संसदेच्या दोन्ही सभआगृहात विरोधकांकडून गदारोळ घालण्यात आला आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या संघर्षाची परिस्थिती निवळत नाही, त्यात आता दोन महिलांच्या व्हायरल व्हिडिओवरुन वातावरण तापलं आहे. दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ 4 मे रोजीचा असल्याचं समोर आलं आहे.
मणिपूर हिंसाचार आणि महिलांच्या व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद थेट संसदेच्या अधिवेशनात उमटले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सत्ताधारी सरकारला घेरण्यात आलं असून त्यावरुन गदारोळ झाला. गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या पावडरमुळे तरूणाला कॅंन्सर; न्यायालयाने ठोठावला 1.5 अब्ज दंड
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनामध्ये देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मोदी सरकारला धारेवर धऱण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मणिपूर राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरु होता. या हिंसाचारात अनेकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणावर सत्ताधारी सरकार आत्तापर्यंत गपगार का होतं? असा सवाल विरोधकांकडून संसदेत विचारण्यात येत आहे.
‘महाराष्ट्र भूषण’चा वाद चिघळला! फडणवीसांना घेरत जयंत पाटलांनी केली ‘ही’ मागणी
एवढंच नाहीतर हिंसाचारानंतर आता दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल आहे. त्यावरुनही मणिपूरमध्ये परिस्थिती तणावग्रस्त झाल्याचं दिसतंय. या दोन्ही प्रकरणांवरुन विरोधकांनी संसदेत गदारोळ घातला आहे. त्यानंतर संसदेच कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. उद्यापर्यंत 10 वाजेपर्यंत संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
कृषी कर्जांचे वाटप झालेच नाही, सरकार फक्त जखमेवर मीठ चोळते; पटोलेंची घणाघाती टीका
दोन महिलांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या महिला नग्न अवस्थेत असून त्यांची धिंड काढण्यात आली आहे. एवढंच नाहीतर या दोन महिलांवर अत्याचारही करण्यात आल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनकडून करण्यात आला आहे. एकंदरीत या संपूर्ण घडामोडींनंतर मणिपूर राज्यात पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, महिलांच्या व्हिडिओप्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली असून या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरुन व्हिडिओवर बंदी घालण्याचे निर्देश महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत.