Download App

संसदेत खुलेआम धूर सोडला, आधी UAPA अंतर्गत गुन्हा; आता 7 दिवसांची पोलीस कोठडी

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : बुधवारी नवीन संसद भवनात सुरक्षा भंग (Parliament security breach) केल्याप्रकरणी अटक करण्यात असलेल्या चार आरोपींना पटियाला हाऊस कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. दिल्ली पोलिसांचे सहाय्यक सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींविरुद्ध UAPA च्या कलम 16A (दहशतवाद कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींना लखनौ आणि मुंबईला चौकशीसाठी न्यावे लागणार आहे. ते शूज लखनौहून आणले होते, तर कलर स्मॉग मुंबईहून आणले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार अन् पेपरफुटीला लगाम; सरकारकडून समिती गठीत 

काल लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना दोन व्यक्तींनी (सागर शर्मा, मनोरंजन डी) सुरक्षेला बगल देत प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली. त्यांनी सभागृहात स्मोक बॉम्ब फेकून तो धुर केला. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. एका तरुण व तरुणीने (अमोल शिदे, नीलम) बाहेर आंदोलन केले. त्यांनी तानाशाही नही चलेगी, अशा घोषणा दिल्या असता त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिन्हा यांच्या व्हिजिटर पासवर तरुणांनी संसदेत प्रवेश केल्याचे समोर आलं. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते.

नगर शहर सहकारी बॅंक फसवणूक प्रकरण : सीए विजय मर्दाला पोलीस कोठडी 

आता आरोपी- मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल शिंदे आणि नीलम देवी यांनी न्यायालयाकडे मोफत कायदेशीर मदतीची मागणी केली. त्यांची मागणी मान्य करत न्यायालयाने नवी दिल्ली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मोफत कायदेशीर मदत देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शहर पोलिसांनी एनआयए प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर हजर केले होते. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांशिवाय दहशतवाद विरोधी कायदा UAPA अंतर्गत 120 बी, 452 हे गुन्हे दाखल केले. पोलिसांनी त्यांच्या 15 दिवसांच्या कोठडीत चौकशीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये अनेक महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आरोपींची चौकशी करत असून अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. स्पेशल सेलची डझनहून अधिक पथके वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा दहशतवादी संघटनेच्या दृष्टिकोनातूनही तपास केला जात आहे.

सागर, मनोरंजन, अमोल आणि नीलम यांना पोलीस कोठडी सुनाण्यात आली. तर सध्या मुख्य सूत्रधार ललित झा फरार आहे.

 

Tags

follow us