Petrol, Diesel Prices Hiked Again : खिशाला पुन्हा कात्री! देशात पेट्रोल, डिझेल पुन्हा महागलं…

देशात अवघ्या चार दिवसांतच पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलीयं.

Untitle (9)

Untitle (9)

Petrol, Diesel Prices Hiked Again : सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आता पुन्हा एकदा कात्री लागलीयं. देशात मागील चार दिवसांत दुसऱ्यांदा इंधनाच्या दरात वाढ झालीयं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झालीयं. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 90 पैशांनी वाढ झाल्याने मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये तर डिझेल 94.08 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे.

दुसरीकडे राजधानी दिल्लीत पेट्रोल 87 पैशांनी महागलं असून 98.64 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 91 पैशांच्या वाढीसह 91.58 रुपये प्रतिलिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलमध्ये सर्वाधिक म्हणजेच ९६ पैशांची वाढ झाली असून तिथे पेट्रोलचा दर १०९.७० रुपयांवर पोहोचला आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता होती. त्यानुसार आता पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा धडाका लावला असून मागील शुक्रवारीच 3 रुपये आणि आता 90 पैशांची वाढ झाल्याने देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसलीयं.

काय पाणीपुरीत हाडूक! चवीच्या नादात महिलेने चावलं असतं ‘हाड’; पाहा व्हायरल व्हिडिओ

या दरवाढीमुळे केवळ वाहनधारकांनाच फटका बसणार नाही, तर डिझेल महागल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार आहे. परिणामी, येत्या काळात भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूही महागण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल प्रति लिटर ०.८२ रुपयांनी महाग झाले असून, आता ते १०४.४९ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. शहरात डिझेलच्या दरात प्रति लिटर ०.८६ रुपयांची वाढ होऊन तो ९६.११ रुपये प्रति लिटर झाला आहे.

विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी; स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी 18 जूनला मतदान

पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त, दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरातही अलीकडेच वाढ करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात प्रति किलो २ रुपयांची वाढ झाल्यानंतर, १७ मे रोजी सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपयाने वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर, दिल्लीत सीएनजीचा किरकोळ दर ८०.०९ रुपये प्रति किलो आहे. नोएडा आणि गाझियाबादमध्ये दर ८८.७० रुपये प्रति किलो आहेत, तर गुरुग्राममध्ये सीएनजीचा दर ८५.१२ रुपये प्रति किलो नोंदवला गेला आहे. मुझफ्फरनगर आणि मेरठमध्ये सीएनजीचे दर ८८.५८ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

Exit mobile version