PM Modi On NEET Exam : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा चर्चेत असून या प्रकरणावरुन चारही बाजूने मोदी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. तर दुसरीकके पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी देखील आंदोलन करत असल्याने मोदी सरकारवर दबाव वाढत चालला आहे. तर आता या प्रकरणात पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी एक व्हिडिओ शेअर करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
मला कल्पना आहे की पेपर फुटीची (NEET Exam) घटना ही काही किरकोळ बाब नाही. यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. म्हणूनच, या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दोषींना अटक करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये हे सुनिश्चित करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी होती त्यामुळे परीक्षा लवकरात लवकर घेणे अत्यंत आवश्यक होते. कमीत कमी वेळेत हे सर्व व्यवस्थापित करण्यासाठी सरकारने आपली सर्व संसाधने पणाला लावली आणि अवघ्या पाच-सहा दिवसांपूर्वी, म्हणजेच 19 तारखेला निकाल जाहीर करण्यात आले.
More strict actions against paper leaks to come in tomorrow’s Cabinet! pic.twitter.com/NRysBukk5U
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2026
मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार
देशभरातील विद्यार्थ्यांच्या यशाची बातमी आनंद देणारी असली, तरी आम्ही केवळ त्यावरच समाधान मानून थांबणारे नाही आहोत. म्हणूनच, ‘फास्ट-ट्रॅक कोर्ट’ स्थापन करण्याच्या दिशेने काम करण्याच्या सूचना मी आज संबंधित विभागांना दिल्या. संबंधित विभागांनी आज उशिरा मला यासंदर्भातील मसुदा सादर केला. फास्ट-ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असलेला हा मसुदा उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवला जाईल.
पुन्हा मुसळधार पाऊस; तब्बल 20 जिल्ह्यांना ऑरेंज अन् यलो अलर्ट जारी-
मंत्रिमंडळाच्या सूचनांनुसार अंतिम स्वरूप दिल्यानंतर, आम्ही हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करू ज्याची सुरुवात सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाईल असं प्रतप्रधान मोदी म्हणाले.
