PM Modi Instagram Reel : पंतप्रधान मोदींचा इन्स्टाग्राम विक्रम; 24 तासांत 30 कोटींहून अधिक व्ह्यूज

PM Modi Instagram Reel : पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर नवीन विक्रम केला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सरकारकडून करण्यात आलेल्या

PM Modi Instagram Reel

PM Modi Instagram Reel

 PM Modi Instagram Reel : पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्रामवर नवीन विक्रम केला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सरकारकडून करण्यात आलेल्या उपयोजनेबद्दल माहिती देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी रात्री एक रिल पोस्ट केली होती या रिलवर 24 तासांच्या आत 30 कोटी 90 लाखांहून (309 दशलक्ष) अधिक व्ह्यूज मिळाले आहे. यापूर्वी इन्स्टाग्रामवर 24 तासात  30 कोटी (300 दशलक्ष) व्ह्यूजचा मागील जागतिक विक्रम मागे पडला आहे.
या रीलमध्ये पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी पेपर फुटीनंतर गेल्या अडीच महिन्यांत उचललेल्या ठोस पावलांची सविस्तर माहिती दिली. तसेच  विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या रिलमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली की केंद्रीय मंत्रिमंडळ एक कठोर कायदेशीर चौकट तयार करेल. या चौकटीत फास्ट ट्रँक  न्यायालये आणि परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकरणांमध्ये सामील असलेल्या व्यक्ती व टोळ्यांसाठी कठोर शिक्षेच्या तरतुदींचा समावेश असेल.
पंतप्रधान मोदींचा नवीन व्हिडिओ 
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, थँक्यू फ्रेंड्स.. काल रात्री मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी पोस्ट केलेल्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला आणि ज्या सकारात्मक सूचना केल्या, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. यापुढेही अधिक एक्टिव्हपणे आपला संवाद सुरु राहणार असं या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले.

इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा 

तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत सरकारच्या कामांची माहिती पोहचवा असे आवाहन केले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीदरम्यान मोदी यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे इन्स्टाग्रामवर तुम्ही किती सक्रिय राहतात असा प्रश्न विचारला. तसेच इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग एक्टिव्ह असतो. त्यामुळे सरकारनेही या माध्यमातून त्यांच्याशी थेट संपर्क वाढवावा असं या बैठकीत सांगितलं असल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकारशी डील केली? स्पष्टीकरण देत सोनम वांगचुक ट्रोलर्सवर संतापले-
Exit mobile version