Download App

New Parliament Building Inauguration : ‘सेंगोल’समोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साष्टांग दंडवत…

New Parliament Building Inauguration : आज नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या हस्ते करण्यात येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही (Lok Sabha Speaker Om Birla)उपस्थित आहेत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी, पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसद भवनात महात्मा गांधींना (Mahatma Gandhi)पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्षावर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला

कार्यक्रमाच्या सुरुवातीला, पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड दिला. राजदंड हातात घेण्याआधी पीएम मोदींनी सेंगोलसमोर साष्टांग दंडवत घेत नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात सेंगोलची स्थापना केली. सोहळ्याची सुरुवात पूजाविधीने झाली.ही पूजा सुमारे तासभर चालली.

नवीन संसदेत सेंगोल बसवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ही इमारत बांधणाऱ्या मजुरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या मजुरांचा सत्कारही केला. लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ सेंगोल बसवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुरोहितांचे आशीर्वाद घेतले.

एकीकडे नवीन संसदेचे उद्घाटन होत असतानाच दुसरीकडे कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ नव्या संसदेसमोर होणाऱ्या महिला महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानी दिल्ली आणि हरियाणाची सीमा पूर्णपणे सील केली आहे.

Tags

follow us