Download App

PM Modi : ‘ते’ ताकदवान पण कारवाई थांबवू नका, पंतप्रधान मोदींचं सीबीआयला पाठबळ

Image Credit: Letsupp

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) च्या हिरक महोत्साव सोहळ्यात मनोगत व्यक्त केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मोदींनी हा संवाद साधला. यावेळी त्यांनी शिलॉंग, पुणे आणि नागपुरमधील सीबीआयच्या नवीन कार्यालयांचं उद्घाटन केलं. तसेच त्यांनी सीबीआयच्या हिरक महोत्सवानिमित्त टपालचं तिकीट आणि एक नाण्याचंही अनावरण केलं. तसेच सीबीआयचं ट्वीटर अकाउंटही लॉन्च केलं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सीबीआयला पाठबळ दिलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुम्हाला कारवाई करण्यासाठी थांबण्याची गरज नाही. मला माहीत आहे. तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करत आहात ते ताकदवान लोक आहेत. अनेक वर्ष ते सत्तेत होते. आजही ते काही राज्यात सत्तेत आहेत. पण तुम्हाला तुमच्या कामावर फोकस ठेवायचा आहे. कोणीही भ्रष्टाचारी असता कामा नये. असं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi : भाजप पक्ष हा बोगस पदव्यांची फॅक्ट्री, संजय राऊतांचा घणाघात

अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘2014 नंतर व्यवस्थेवरचा विश्वास कायम ठेवणे हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे काळ्या पैशांविरोधात आम्ही मिशन सुरू केलं आहे. भ्रष्टाचारामुळे तरूणांना संधी मिळत नाही. घराणेशाही निर्माण होते. त्यामुळे देशाचं सामर्थ्य कमी होतं.

त्यामुळे देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करण्याची जबाबदारी साबीआयची आहे. भ्रष्टाचार हा लहान गुन्हा नाही. तो गरिबांचे हक्क हिरावून घेतो. त्यामुळे तुम्हाला कारवाई करण्यासाठी थांबण्याची गरज नाही. असं म्हणत त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सीबीआयला पाठबळ दिलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज