PM Modi to address nation at 8 pm today Know When The PM Surprised The Nation : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीत आणि युद्धबंदीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (दि.12) रात्री ८ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. देशाला संबोधित करण्याची ही मोदींची पहिलीच वेळ नसून, यापूर्वी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक धक्के दिले आहेत. यात कधी नोटाबंदीची घोषणा तर, कोरोनाच्यावेळी लॉकडाऊन, कलम ३७० किंवा लष्करी कारवाया यासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.
Video : ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी; पुढील मिशनसाठी लष्करी तळ, सिस्टम रेडी; पाकला भारताचा मोठा मेसेज
मोदींनी रात्री वाजता संबोधित करताना कोणते धक्के दिले?
२५ डिसेंबर २०२१ : नाताळच्या रात्री अचानक देशाला संबोधित करताना मोदींनी १५-१८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी ‘प्रिकॉशन डोस’ जाहीर केला.
१९ नोव्हेंबर २०२१ : पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.
२२ ऑक्टोबर २०२१ : भारताने कोविड लसीकरणाचा १ अब्ज टप्पा ओलांडल्यानंतर राष्ट्राला संबोधित केले.
७ जून २०२१ : केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व लोकांसाठी मोफत लसीकरण आणि लसीकरण धोरणाचे केंद्रीकरण जाहीर केले.
20 ऑक्टोबर 2020 आणि 30 जून 2020 : कोरोनाबाबत सावध राहण्याचे आवाहन आणि गरीब कल्याण अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्त्रोचा ‘मास्टर’ प्लान सक्सेसफुल; पाकिस्तानला फोडला पुरता घाम
१२ मे २०२० : स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर.
१४ एप्रिल, ३ एप्रिल आणि २४ मार्च २०२० : लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला, ५ एप्रिल रोजी दिवे लावण्याचे आवाहन आणि २१ दिवसांच्या लॉकडाऊनची पहिली मोठी घोषणा.
१९ मार्च २०२० : ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन आणि कोरोना योद्ध्यांचा सन्मान.
९ नोव्हेंबर २०१९ : अयोध्या निकालावर राष्ट्राला संबोधित केले आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.
८ ऑगस्ट २०१९ : जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारे भाषण.
ऑपरेशन सिंदूर : भारताला काय मिळालं, पाकिस्तानचं किती नुकसान? 12 पॉइंट्समध्ये घ्या जाणून..
२७ मार्च २०१९ : भारताच्या ए-सॅट क्षेपणास्त्राच्या यशाबद्दल राष्ट्राला उद्देशून भाषण.
३१ डिसेंबर २०१६ : नववर्षापूर्वी गरीब आणि शेतकऱ्यांसाठी योजनांची घोषणा.
८ नोव्हेंबर २०१६ : यासर्व संबोधतना सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे ५०० आणि १००० रुपयांच्या नोट बंदीची घोषणा.