Download App

‘खुद्द बाबासाहेबही संविधान बदलू शकत नाहीत’; ‘संविधान बदलणार’ म्हणणाऱ्यांना PM मोदींची चपराक

Image Credit: Letsupp

Pm Narnedra Modi On Congress : खुद्द बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आले तरीही संविधान बदलू शकत नसल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी संविधान बदलणार म्हणणाऱ्या विरोधकांना चपराक दिली आहे. विरोधकांकडून आयोजित सभेतून भाजप संविधान बदलणार असून लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे. त्यावरुन राजस्थानातील बारमरमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील एससी, एसटी, आणि ओबीसींसोबत मागील अनेक वर्षांपासून भेदभाव करणारा काँग्रेस पक्ष आता एक जुनी रेकॉर्ड वाजवत आहे. निवडणुकी आली की संविधानावरुन खोटं बोलणं ही आता इंडिया आघाडी आणि काँग्रेसची फॅशनच झाली आहे. ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांचा पराभव केला होता. काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळू दिला नसल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

मग मंडलिक कोल्हापूरचे वारसदार आहेत का? शाहू महाराजांबाबतच्या वक्तव्यावर राऊतांचा टोला

मोदींचे हे शब्द लिहून ठेवा :
संविधानाचा जो प्रश्न आहे, त्यावर मोदींचा शब्द लिहुन ठेवा खुद्द बाबासाहेब आंबेडकर आले तरीही ते संविधान संपवू शकत नाहीत, असं मोदी म्हणाले आहेत.

देशात हा मोदी आहे ज्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या निगडीत पंचतिर्थांचा विकास केला आहे. बाबासाहेब आणि संविधानाच अपमान करणाऱ्या काँग्रेसपासून लोकांन सावध राहणं गरजेचं आहे, 10 वर्षे मला चांगल काम करण्यापासून रोखलं आहे, त्यामुळे आता देश काँग्रेसला शिक्षा देऊन साफ करणार असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us

वेब स्टोरीज