PM Narendra Modi : इथं ड्रामा नाही तर डिलीव्हरी हवीयं, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी दम भरलायं. संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार असून अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी माध्यमांना संबोधित केलंय.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत लोकशाही जगत आला असून भारत म्हणजेच लोकशाही ही गोष्ट वारंवार सिद्ध झालीयं. बिहारच्या निवडणुकीच्यावेळी आपल्याला प्रचिती आली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. तसेच राजकारणात नकारात्मकता उपयोगी पडू शकते. शेवटी राष्ट्रनिर्मितीसाठी सकारात्मक विचारसरणी असणं आवश्यक आहे. तुम्ही नकारात्मकतेला मर्यादित ठेवाल आणि राष्ट्रनिर्मितीवर अधिक लक्ष केंद्रीत कराल, ही मला तुमच्याकडून आशा असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे.
निराशतेून बाहेर पडण्यासाठी संसदेचा वापर…
विरोधकांनी पराभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी संसदेचा वापर केला आहे. मागील काळात आपल्या संसदेचा गैरवापर झाला. काही राज्यांत जिथं काही पक्ष, नेते सत्तेत आले. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे सभापती सीपी राधाकृष्णन यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, संसदेचं हे हिवाळी अधिवेशन आणखी एका गोष्टीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपले नवे सभापती आज पहिल्यांदा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना यानिमित्ताने शुभेच्छा देतो, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा ‘विराट’ विजय, 17 धावांनी दक्षिण आफ्रिके पाजलं पाणी
दरम्यान, यावेळी बोलताना मोदींनी नव्या जीएसटीचे संकेत दिले आहेत. जीएसटीमध्ये आपण अलीकडेच सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे देशात आल्हाददायक वातावरण आहे. या अधिवेशनातही जीएसटीच्या अनुषंगाने जनतेसाठी काही नवे निर्णय घेतले जातील, असं ते म्हणाले आहेत.
