Download App

युपीएच्या काळात अर्थव्यवस्थेचं नूकसान; मोदी सरकारचा श्वेतपत्रिका काढत हल्लाबोल

White Paper : संसदेच्या अधिवेशनामध्ये सध्या विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यंदाच्या वर्षीचं बजेट सादर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचं सगळंच बाहेर काढत हल्लबोल चढवला होता. आता निर्मला सीतारामण यांनी युपीए सरकारच्या काळात झालेल्या अर्थव्यवस्थेच्या नूकसानीसंदर्भात श्वेतपत्रिकाच काढत हल्लाबोल केला आहे.

मोदी सरकारकडून संसदेच्या अधिवेशनात आज 2014 च्या आधी अर्थव्यवस्थेबाबत श्वेतपत्रिका सादर करण्यात आली आहे. या श्वेतपत्रिकेमध्ये युपीए सरकारच्या काळातील एकूण 10 वर्षांतील अर्थिक गैरव्यवस्थापनाबाबत थेट भाष्य करण्यात आलं आहे. युपीए सरकार अर्थिक आघाड्यांमध्ये सुविधा राखण्यात सपशेल फेल ठरलं असल्याचं श्वेतपत्रिकेत म्हटलं आहे. युपीए सरकारने अर्थव्यवस्थेत निर्माण केलेल्या आघाड्यांमुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

युपीए सरकारने वाजपेयींच्या एनडीए सरकारनं आणलेल्या आर्थिक सुधारणांचा, प्रभावांचा आणि अनुकुल वैश्विक परिस्थितीचा लाभ घेतला आणि दीर्घकालीन आर्थिक व्यवहारांची चिंता न करता राजकीय उद्देशानं आर्थिक शोषण सुरु केलं. यामुळं अर्थव्यवस्थेवर कर्जाचा बोझा वाढला, असल्याचा दावाही श्वेतपत्रिकेतून करण्यात आला आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमी मोदी सरकारकडून अंतरिम बजेट सादर करण्यात आलं आहे. या बजेटमधून सर्वसामान्य जनतेला काहीही मिळालं नसून सरकार फसवणूक करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या अभिभाषणानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारचा स्वातंत्र्याआधीपासूनचा इतिहास काढत जोरदार हल्लाबोल चढवला होता.

पंतप्रधान मोदींची टीका :
देश तोडण्याचे नरेटिव्ह काँग्रेसने सेट केले आहेत. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. काँग्रेसने ओबीसींना पूर्ण आरक्षण दिलं नाही, ही काँग्रेस आम्हाला सामाजिक न्याय शिकवत आहे. काँग्रेस दहशतवाद सहन करणारी शत्रूच्या ताब्यात जमीन दिली, सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली असल्याचीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

follow us