Download App

स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी, कराड अन् राणे.. जुन्या कॅबिनेटमधील 20 दिग्गजांना डच्चू

अनेक दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे हे नेते आता नव्या सरकारमध्ये दिसणार नाहीत.

PM Narendra Modi Cabinet : लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने निकाल देऊन (PM Narendra Modi Cabinet) टाकल्यानंतर आता एनडीए सरकार अस्तित्वात येणार आहे. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर आणखीही काही खासदार शपथ घेतील. यामध्ये महाराष्ट्रातील खासदार असतील. नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसतील त्यासोबतच जुन्या मंत्रिमंडळातील नावाजलेले चेहरे विस्मृतीत जातील. यंदा भाजपला बहुमत नाही. अनेक दिग्गज नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे हे नेते आता नव्या सरकारमध्ये दिसणार नाहीत. तर काही ठिकाणी भाजपने खांदेपालट केला आहे. दरम्यान, आताच्या मंत्रिममंडळात जुन्या कॅबिनेटमधील 20 मंत्र्यांना संधी मिळाली नसल्याचं समोर आलं आहे.

Modi Cabinet : प्रतापराव जाधव, रक्षा खडसे… नरेंद्र मोदींसोबत कोणते नेते घेणार शपथ? पाहा यादी

निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे आता एनडीए सरकार अस्तित्वात येणार आहे. भाजपला एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवावं लागणार आहे. त्यामुळे या घटक पक्षांनाही कॅबिनेटमध्ये मंत्रीपदं द्यावी लागत आहेत. या कारणामुळेच भाजपातील अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाला आहे. यामध्ये स्मृती इराणी यांच्यापासून केरळमधील भाजप नेते राजीव चंद्रशेखर अशा दिग्गज नेत्यांची नावं आहेत.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात स्मृती इराणी आणि राजीव चंद्रशेखर यांसारख्या नेत्यांना महत्वाची खाती देण्यात आली होती. अनुराग ठाकूर यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी होती. परंतु, आताच्या सरकारमध्ये जवळपास वीस नेत्यांना संधी मिळणार नाही असे दिसत आहे. आज दुपारी मंत्रिपदासाठी नावं निश्चित झालेल्या खासदारांची पीएम मोदींनी बैठक घेतली. या बैठकीसाठी हे नेते उपस्थित नव्हते. यावरून स्पष्ट झाले आहे की या नेत्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात आता संधी मिळणार नाही.

‘या’ नेत्यांना मिळणार नाही संधी

यामध्ये स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्हीके सिंह, अश्विनी चौबे, नारायण राणे, अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मिनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आरके सिंह, अर्जुन मुंडा, निशीथ प्रामाणिक, सुभाष सरकार, जॉन बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भागवत कराड यांना संधी मिळणार नाही अशी शक्यता आहे.

NDA सरकार पण, मराठवाडा राहिला कोरडाच; कराडांना वगळलं, भुमरेंचीही पाटी कोरी..

यामध्ये असेही काही नेते आहेत जे निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर काही जणांना भाजपने तिकीट दिलं नव्हतं. यात असेही काही नेते आहेत ज्यांना उमेदवारी मिळाली ते निवडूनही आले मात्र त्यांना मंत्रि‍पदापासून दूर ठेवण्यात आले. निवडणूक जिंकणाऱ्या नेत्यांत अजय भट्ट, अनुराग ठाकूर, नारायण राणे यांचा समावेश आहे. तर निवडणुकीत पराभूत झालेल्यांमध्ये साध्वी निरंजन ज्योती, आरके सिंह, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, राजीव चंद्रशेखर, निशीथ प्रामाणिक, अजय मिश्रा टेनी, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, सुभाष सरकार यांचा समावेश आहे.

follow us

वेब स्टोरीज