2014 च्या आधी असलेल्या पंतप्रधानांवर सुपर पावर होती, काँग्रेस सरकार रिमोट कंट्रोलने चालवल जात होतं, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं आहे. दरम्यान, राजस्थान दौऱ्यावर होते. राजस्थानमधील अजमेरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधिक करत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई, 10 किलो IED बॉम्बसह 3 दहशतवाद्यांना अटक
पंतप्रधान मोदी म्हणाले, 2014 च्या आधी देशातली जनता भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरली होती. दर दिवस मोठ्या शहरांमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले होत होते. सीमेवर रस्ते बनवण्यासाठीही काँग्रेस सरकार घाबरत होतं. पंतप्रधानांच्यावर सुपर पावर होती, काँग्रेस सरकार रिमोट कंट्रोलने चालत असल्याचा घणाघात मोदींनी केला आहे.
Madha Loksabha : रामराजेंचे नाव एकमताने पुढे येताच पवारांची सावध प्रतिक्रिया
तसेच काँग्रेस सरकारच्या काळात निर्णय होत नव्हते. जनतेकडून मते घेऊन जनतेलाच फसवलं जात होतं. अशावेळी मतदारांच्या एका मतामुळे भारत विकासाच्या वाटेवर आला आहे. जगभरात आज देशाचं गुण गायले जात असल्याचं ते म्हणाले आहेत.
Gautami Patil: गौतमी पाटीलवरुन राजकारणातील दोन पाटलांमध्ये जोरदार जुंपली
त्याचप्रमाणे 50 वर्षांपूर्वी काँग्रेसने देशाला गरीबी हटवण्याची गॅरंटी दिली होती. हा गरिबांसोबत केलेला सर्वात मोठा विश्वासघात आहे. गरीबांना त्रास देणं ही काँग्रेसची नीती आहे. काँग्रेस सरकार देशातल्या महिला बालकांच्या जीवाशी खेळलं आहे. गरोदर महिलांना जीवनरक्षक लसही काँग्रेसच्या काळात मिळत नसल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
दरम्यान, देशात भाजपचं सरकार स्थापन झाल्यानंतर देशातल्या महिला आणि बालकांचा जीव वाचवण्याचं काम आम्ही केलं असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच काँग्रेसकडे देशाच्या विकासासाठी कोणतंही व्हिजन नाही. काँग्रेस सरकार हमीभावाचं आश्वासन पूर्ण करणार होते? काँग्रेसने ते आश्वासन पाळले का? तुम्ही सांगितले तसे केले का? असा सवाल उपस्थित करीत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.