सद्गगुरु जग्गी वासुदेव यांच्या भक्तांसाठी चिंतेची बातमी : मेंदूवर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू सद्गुरु जग्गी वासुदेव (Sadguru Jaggi Vasudev) यांच्या प्रकृतीविषयी मोठी माहिती समोर आली आहे. सद्गुरु यांच्या मेंदूवर दिल्ली येथील अपोलो रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आली आहे. पत्रकार आनंद नरसिंहन यांनी सद्गुरु यांच्यावरील शस्त्रक्रियेची माहिती दिली. (Popular spiritual guru Sadhguru Jaggi Vasudev has undergone emergency brain surgery at Apollo Delhi.) […]

Sadguru Jaggi Vasudev

Sadguru Jaggi Vasudev

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू सद्गुरु जग्गी वासुदेव (Sadguru Jaggi Vasudev) यांच्या प्रकृतीविषयी मोठी माहिती समोर आली आहे. सद्गुरु यांच्या मेंदूवर दिल्ली येथील अपोलो रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आली आहे. पत्रकार आनंद नरसिंहन यांनी सद्गुरु यांच्यावरील शस्त्रक्रियेची माहिती दिली. (Popular spiritual guru Sadhguru Jaggi Vasudev has undergone emergency brain surgery at Apollo Delhi.)

मिळालेल्या माहितीनुसार, सद्गुरू जग्गी वासुदेव यांना मागील काही दिवसांपासून तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत होता, तसेच वारंवार उलट्या होत होत्या. यानंतर 17 मार्च रोजी त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. विनित सुरी यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना एमआरआय करण्याचा सल्ला दिला होता. या एमआरआय रिपोर्ट्समध्ये त्यांच्या मेंदूमध्ये सूज आल्याचे आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले होते.

त्यानंतर आज (20 मार्च) दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील डॉ. विनित सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस. चटर्जी यांच्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर सद्गुरु यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढण्यात आला असून त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. नरसिंहन यांच्या अपडेटनुसार, शस्त्रक्रियेनंतर त्यांचा मेंदू, शरीर आणि महत्त्वाच्या पॅरामीटर्समध्ये चांगल्या सुधारणा होत आहेत.

 

Exit mobile version