Pradeep Gupta’s analysis on BJP’s victory : भारताच्या राजकारणात भाजपच्या सलग निवडणूक विजयामागील कारणांवर बऱ्याच काळापासून चर्चा होत आहे. विरोधकांकडून अनेकदा असा आरोप केला जातो की भाजपचे यश मुख्यतः हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणावर आधारित आहे. मात्र निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांना हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावत भाजपच्या विजयामागे गुड गव्हर्नन्स, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि मजबूत संघटनशक्ती हे अधिक प्रभावी घटक असल्याचे सांगितले आहे. त्याच्या मते, एखादा पक्ष केवळ ध्रुवीकरणाच्या आधारावर वारंवार सत्तेत येऊ शकत नाही.
उत्तर प्रदेशात सलग पुनरागमन, मध्य प्रदेशातील दीर्घकालीन सत्ता किंवा बिहारमध्ये एनडीएची सातत्याने टिकून राहिलेली ताकद यामागे प्रशासन, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांपर्यंत पोहोचलेल्या योजनांची भूमिका महत्वाची आहे. गेल्या दशकात भाजपने स्वतःला केवळ वैचारिक पक्ष म्हणून मर्यादित ठेवले नाही, तर एक प्रभावी निवडणूक यंत्रणा म्हणून विकसित केले. प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, आयुष्मान भारत, मोफत धान्य वितरण आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यांसारख्या योजनांनी मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत थेट लाभ पोहोचवला.
यामुळे लाभार्थी मतदार हा नवा राजकीय वर्ग निर्माण झाला, ज्याने भाजपच्या इजकीय विस्ताराला मोठे बळ दिले. मतदारांमध्ये सरकार प्रत्यक्ष काम करत असल्याची भावना निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरला. त्यामुळे निवडणुकीतील प्रचार केवळ भावनिक किंवा धार्मिक मुद्द्यांपुरता मर्यादित राहिला नाही, तर विकास, सुविधा आणि सरकारी योजनांच्या प्रभावभोवती फिरू लागला. धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रभाव भारतीय निवडणुकांमध्ये पूर्णपणे नाकारता येत नसला, तरी तो एकमेव निर्णायक घटक मानणे वास्तववादी ठरत नाही.
समान फी पण वेगळी वागणूक? RCC च्या फोटॉन बॅच मागचं गुपित समोर; NEET स्कॅममुळे कोचिंग इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह
भाजपने बूथ पातळीवरील संघटन, मायक्रो मॅनेजमेंट, डेटा आधारित निवडणूक रणनीती आणि लाभार्थ्यांशी सातत्यपूर्ण संपर्क या माध्यमातून स्वतःची निवडणूक क्षमता मजबूत केली. पक्षाने निवडणूक व्यवस्थापनाला व्यावसायिक स्वरूप दिले, ज्याचा परिणाम मतदारांशी थेट जोड निर्माण करण्यात आला. याउलट विरोधक अनेकदा भाजपच्या विजयाचं कारण फक्त धार्मिक ध्रुवीकरणात शोधताना दिसतात, त्यामुळे संघटन, योजनांची डिलिव्हरी आणि मतदारांच्या बदलत्या अपेक्षा याकडे त्यांचे दुर्लक्ष होते.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा देखील भाजपच्या यशात वाटा आहे. मजबूत नेतृत्व, राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे आणि प्रभावी संवादशैली यांच्या माध्यमातून भाजपने व्यापक जनाधार निर्माण केला. सोशल मीडिया, डिजिटल प्रचार आणि थेट संवादाच्या माध्यमातून पक्षाने आपला संदेश प्रभावीपणे पोहोचवला. त्यामुळे मतदारांमध्ये नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ झाला.
पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शाह गद्दार; राहुल गांधी यांची आक्रमक टीका
दरम्यान, प्रदीप गुप्ता यांनी निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांचा देखील उल्लेख करताना सांगितले की, ते ज्या पक्षासोबत काम करतात, तेथे भविष्यातील राजकीय शक्यता त्यांना दिसत असतात. तामिळनाडूमध्ये डीएमके सोबत काम करताना नव्या नेतृत्वाचा उदय जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याच संदर्भात अभिनेता-राजकारणी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा देखील उल्लेख करण्यात आला.
एकूणच पाहता, भाजपच्या विजयाचे विश्लेषण केवळ हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाच्या चौकटीत करणे अपुरे ठरते. धार्मिक मुद्दे काही प्रमाणात प्रभावी असले, तरी भाजपची खरी ताकद संघटनशक्ती, कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, लाभार्थी राजकारण, मजबूत नेतृत्व आणि निवडणूक व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतींमध्ये दिसून येते. त्यामुळे भारतीय राजकारणात भाजपचे यश समजून घेण्यासाठी मतदारांचे बदलते वर्तन, शासनाचा प्रत्यक्ष परिणाम आणि पक्षाची तळागाळातील पकड यांचा एकत्रित विचार करणे आवशयक ठरते.
