Prajwal Revanna Obscene Video Case : कर्नाटकातील हसन मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचा निवडणूक सहयोगी असलेल्या जेडीएसचे विद्यमान उमेदवार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्या नावाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. आता ही चर्चा त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल नव्हे तर, त्यांच्या व्हायरल होणाऱ्या अश्लील व्हिडिओमुळे. रेवन्ना यांच्यावरील गंभीर आरोप आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर जेडीएसने प्रज्वल रेवन्ना यांना पक्षातून निलंबित केले आहे. आता हे प्रकरण नेमके काय? प्रज्वल यांच्यावर होणारे नेमके आरोप काय? आणि अश्लील व्हिडिओचं हे प्रकरण नेमकं कसं समोर आलं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया.
भटकती आत्मा! ‘माझं बोट धरुनच राजकारणात आलेत..,’, पवारांनी मोदींची सुरुवातच काढली
नेमकं प्रकरण काय?
माजी पंतप्रधान देवेगैडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळ, हजारो सेक्स व्हिडिओ रेकॉर्ड करण्याबरोबरच महिलांना धमकावणे आणि कट रचणे या सारखे अनेक गंभीर आरोप आहेत. प्रज्वल रेवण्णा यांचे वडील कर्नाटकचे आमदार तर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी हे त्यांचे काका आहेत. रेवन्ना यांच्याविरोधात त्यांच्या स्वयंपाकी महिलेना लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार केली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत संबंधित पीडित महिलेने 2019 ते 2022 दरम्यान आपल्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचे तसेच आपल्या मुलीशी गैरवर्तनही केल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे प्रज्वल रेवन्ना आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी हे सर्व व्हिडिओ बनावट असल्याचे आणि आपल्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी रचलेले षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
राज्यात PM Modi यांच्या सभांचा धडाका, वेगवेगळ्या लूकने केले मतदारांना आकर्षित; पाहा फोटो
जून 2023 मध्ये पहिल्यांदा झाली होती व्हिडिओंची चर्चा
प्रकाशित वृत्तांनुसार अश्लिल व्हिडिओंबाबत प्रज्वल रेवन्ना यांनी 86 मीडिया संस्था आणि तीन व्यक्तींविरोधात जून 2023 रोजी बेंगळुरू दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी या व्हिडिओंबाबत सार्वजनिक स्वरूपात चर्चा होण्यास सुरूवात झाली होती. प्रज्वल यांनी न्यायालयाकडे या माध्यम संस्थांना व्हिडिओ प्रकाशित, छपाई किंवा प्रसारित करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच हे व्हिडिओ फेक आणि एडिट केल्याचे म्हटले होते.
ज्या तीन लोकांचे नाव या प्रकरणात प्रज्वल यांनी घेतले होते त्यात प्रज्वल यांचा माजी चालकाच्या नावाचाही समावेश होता. ज्याने सात वर्षांच्या सेवेनंतर मार्च 2023 मध्ये नोकरी रेवन्ना यांच्याकडील सोडला रामराम केला होता. जेव्हा संबंदधित चालक नोकरी करत होता तेव्हा ते प्रज्वलच्या कुटुंबातील सदस्यासारखा होता असेही सांगितले जाते. त्यामुळे त्याला प्रज्वल यांचा फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळणे शक्य होते. परंतु, कालांतराने प्रज्वल आणि ड्रायव्हरमध्ये काही कारणांवरून बाचाबाची झाली तेव्हा चालकाने महिलांच्या अश्लील व्हिडिओवरून रेवन्ना यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, डिसेंबर 2023 मध्ये संबधित चालकाने हासनमध्ये पोलिस तक्रार दाखल केली होती. ज्यात त्याने 13 एकर जमीन न दिल्याने प्रज्वल आणि त्याच्या आईने त्याचे आणि आपल्या पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप केला होता.
मोदींनी माढ्यात विजयाचा डाव टाकला! धनगरी पोशाख, माफी अन् येळकोट-येळकोटचा जयघोष
भाजप नेत्याने उचलला होता मुद्दा
2023 च्या विधानसभा निवडणुकीत होलनरसीपुरा येथून भाजपचे उमेदवार असलेले देवराज गौडा यांनी मला सरकारी अधिकाऱ्यांसह काही महिलांचे सुमारे 3 हजार व्हिडिओ असलेले पेन ड्राइव्ह मिळाले असल्याचा दावा केला होता. तसेच याबाबत त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये राज्याच्या पक्षाध्यक्षांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (hd deve gowda) यांचे नातू तसेच कर्नाटकातील हासन लोकसभेचे खासदार आणि जेडीएसचे उमेदवार प्रज्ज्वल रेवन्ना यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. विशेष म्हणजे गौडा यांच्या याचिकेमुळे प्रज्वल यांना 2023 साली खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती. त्यांनी 2023 मध्ये होलनसीपूरमधून विधानसभा निवडणूकही लढवली होती, परंतु प्रज्वल यांचे वडील एचडी रेवन्ना यांच्याकडून ते निवडणुकीत पराभूत झाले होते.
दरम्यान, या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तसे आदेशही जारी केले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपसोबत युती असलेल्या जेडीएसच्या उमेदवाराचेच नाव या सर्व प्रकरणात आल्याने विरोधक हा मुद्दा कुठपर्यंत नेवून ठेवतात आणि या सर्वाचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.