Mann ki Baat : पंतप्रधान मोदींनी सांगितलं तृणधान्याचं महत्व, पद्म पुरस्कारार्थींचं अभिनंदन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मन की बातच्या (Mann ki Baat) माध्यमातून संपूर्ण देशवासियांशी संवाद साधला. 2023 या वर्षातील मन की बातचा आजचा पहिलाच भाग होता. पंतप्रधान मोदींनी आज तृणधान्याचं महत्व सांगितलंय. ज्वारी (Jowar)आणि बाजरी (Bajra)आरोग्यासाठी उत्तम असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. त्याचवेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेल्या पद्म […]

Mann ki Baat : डिजिटल पेमेंट करा अन् फोटो पाठवा! PM मोदींनी देशवासियांना दिला टास्क

Mann ki Baat : डिजिटल पेमेंट करा अन् फोटो पाठवा! PM मोदींनी देशवासियांना दिला टास्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मन की बातच्या (Mann ki Baat) माध्यमातून संपूर्ण देशवासियांशी संवाद साधला. 2023 या वर्षातील मन की बातचा आजचा पहिलाच भाग होता. पंतप्रधान मोदींनी आज तृणधान्याचं महत्व सांगितलंय. ज्वारी (Jowar)आणि बाजरी (Bajra)आरोग्यासाठी उत्तम असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. त्याचवेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेल्या पद्म पुरस्कार (Padma Award) प्राप्त सर्वांचं अभिनंदन देखील केलं.
YouTube video player
आज मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या अलिबागमधील केनाड गावच्या शर्मीला ओसवाल (Sharmila Oswal)यांचं कौतुक केलंय. शर्मीला ओसवाल या गेल्या 20 वर्षापासून तृणधान्याचं उत्पादन घेताहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही त्या मार्गदर्शन करत असताता. तृणधान्याचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न त्या करताहेत. संयुक्त राष्ट्र संघानं भारताच्या प्रस्तावानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतलाय. बाजरी आणि योग आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. ते दोन्हीही घटक आपल्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं. त्यात सर्वसामान्य लोकांचा सहभाग वाढतोय, त्यामुळं देश नवीन क्रांतीच्या मार्गावर असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी यंदा पद्म पुरस्कार प्राप्त नागरीकांचं अभिनंदन केलं. आदिवासी जीवन शहरी जीवनापेक्षा वेगळंय. त्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो. एवढ्या सगळ्यामध्ये आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. जगाला तृणधान्याचं महत्व समजल्यानं शेतकरी खुश आहेत. तृणधान्य बाजारात आणण्याचं काम उद्योजकांनी केलंय.

भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपला देश लोकशाहीची जननी आहे. याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. लोकशाही आपल्या रक्तात आहे, आपल्या संस्कृतीत आहे. अनादी वर्षांपासून तो आपल्या कामाचा भाग आहे. आपण स्वभावानं लोकशाही समाज आहोत असंही मोदी म्हणाले.

Exit mobile version