PM Modi Speech In Namibia : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. (Modi) या दौऱ्यात त्यांनी नामिबियाचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सचिया मिराबिलिस’ प्रदान करण्यात आला. नामिबियाच्या प्राचीन वाळवंटातील वनस्पती वेल्विट्सचिया मिराबिलिसच्या नावावरून या पुरस्काराचे नाव ठेवण्यात आलं आहे. यानंतर पंतप्रधानांनी नामिबियाच्या संसदेत भाषण केलं. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
लोकशाहीचे मंदिर असलेल्या या सभागृहाला संबोधित करणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मला हा सन्मान दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. लोकशाहीच्या जननीचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. 1.4 अब्ज जनतेच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी नामिबियाच्या संसदेत बोलताना सर्वप्रथम आभार व्यक्त केले.
नामिबियात पार पडलेल्या निवडणूक निकालांचा उल्लेख मोदी यांनी केला. ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी तुम्ही एक ऐतिहासिक क्षण साजरा केला. नामिबियात पहिल्यांदाच महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. तुम्हाला याचा किती गर्व आणि आनंद झाला हे मी समजू शकतो, कारण भारतातही राष्ट्रपतीपदावर महिला विराजमान आहे.
मोदींच्या आधी गृहमंत्री शाहांनी दिले रिटायरमेंटचे संकेत, म्हणाले,निवृत्तीनंतर वेद-उपनिषदे वाचणार अन्
भारताच्या संविधानामुळे एका गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची राष्ट्रपती आहे. संविधानाच्या या शक्तीमुळे माझ्यासारख्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीलाही सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली आहे. कारण ज्यांच्याकडे काहीही नसते त्यांच्याकडे संविधानाची हमी असते असंही ते म्हणाले.
भारतातील लोक स्वातंत्र्यलढ्यात नामिबियाच्या पाठीशी अभिमानाने उभे होते. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीही भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये नैऋत्य आफ्रिकेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी नामिबियातील संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेचे नेतृत्व भारतीय लेफ्टनंट जनरल दिवाण प्रेम चंद करत होते. भारताला तुमच्यासोबत उभे राहिल्याचा अभिमान आहे असंही ते म्हणाले
आम्हाला आनंद आहे की नामिबिया हा भारताच्या UPI-(युनिफाइड पेमेंट इंटरफेस) तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा पहिला देश आहे. आपला द्विपक्षीय व्यापार 800 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आता आगामी काळात त्यात नक्कीच जास्त भर पडणार आहे.