नवी दिल्ली : 1971 पासून काँग्रेस गरिबी हटाव या घोषणेवर निवडणुका लढवत आली. तब्बल 40 वर्षे काँग्रेसने या घोषणा दिल्या, मात्र 40 वर्षात गरिबी नाही हटली तर गरिबांनी देशातून काँग्रेसला हटवले. कारण गरीब आता जागी झाले आहे. 2013 मध्ये काँग्रेसने चलाखी करत 17 करोड लोकांना गरिबीतून श्रीमंतांच्या यादीत टाकले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत आहेत. आज पुन्हा त्यांनी आपल्या शैलीत विरोधकांवर हल्लाबोल केला.मोदी यांच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांनी दाद दिली तर विरोधीपक्षातील खासदारांनी घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला. भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.
मोदी म्हणाले की, 60 वर्षे काँग्रेस परिवाराने केवळ खड्डेच केले. तो खड्डा खोदत असताना. 6 दशके वाया घालवली.. तेव्हा जगातील छोटे छोटे देशही यशाच्या शिखरावर पोहोचले होते. एकीकडे मोदींचे भाषण सुरु असताना दुसरीकडे विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.
नेहरू महान आहेत मग आडनाव वापरायला लाज का वाटते?
काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या योजनांच्या नावावर प्रश्न उपस्थित केले जातात. कोणत्याही कार्यक्रमात नेहरूजींचे नाव घेतले नाही तर काँग्रेसचे लोक संतप्त होतात. मी कुठेतरी वाचले आहे, आजही देशातील 600 हून अधिक योजना गांधी आणि नेहरू कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहेत. तुम्ही आम्हाला प्रश्न करता, पण नेहरू आडनाव स्वतः ठेवायला लाज वाटते का? एवढ्या महापुरुषाचे नाव आडनाव करायला काय हरकत आहे? असा सवाल मोदींनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हा देश कोणत्याही कुटुंबाची जागी नाही. पिढ्यानपिढ्या माणसांनी बनलेला हा देश आहे. आम्हाला अभिमान आहे. जे आपल्या देशाच्या सैन्याला अपमानित करण्याची एकही संधी सोडत नाहीत, आम्ही 21 बेटांना परमवीर चक्र मिळालेल्या वीरांच्या नावावर ठेवले आहे.