Deepfake : गेल्या काही दिवसांपासून डीपफेकच्या (Deepfake) गैरवापराबद्दल सर्वच स्तरावरुन चिंता व्यक्त केली जात आहे. याला अनेक अभिनेते-अभिनेत्री आणि राजकीय नेते देखील बळी पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा देखील डीपफेक तयार केला होता. याबद्दल त्यांनी स्वत: सांगितले होते. आज पीएम मोदींनी G20 वर्च्युअल समिटमध्ये (G20 Virtual Summit) एआयच्या नकारात्मक वापराबाबत चिंता व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 वर्च्युअल समिटमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की “एआयच्या नकारात्मक वापराबाबत जगभर चिंता वाढत आहे. एआयच्या जागतिक नियमनावर आपण एकत्र काम केले पाहिजे, असे भारताचे स्पष्ट मत आहे.”
ते म्हणाले, डीपफेक समाजासाठी आणि व्यक्तीसाठी किती धोकादायक आहेत याचे गांभीर्य समजून घेऊन पुढे जावे लागेल. पुढील महिन्यात भारतात ग्लोबल एआय पार्टनरशिप समिटचे आयोजन केले जात आहे, मला आशा आहे की तुम्ही सर्व यातही सहकार्य कराल.
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात चकमक, 2 जवान शहीद, लष्कराची शोध मोहिम तीव्र
ग्लोबल साउथला प्राधान्य द्यावे लागेल
या शिखर परिषदेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, “21 व्या शतकात जगाला पुढे जाताना ग्लोबल साउथला प्राधान्य द्यावे लागेल. ग्लोबल साउथचे देश अनेक अडचणींमधून जात आहेत.विकासाच्या अजेंड्याला पूर्ण पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे.”
ओलिसांच्या सुटकेचे पंतप्रधान मोदींनी स्वागत केले
पंतप्रधान पुढे म्हणाले, आमचा विश्वास आहे की दहशतवाद आपल्या सर्वांना अस्वीकार्य आहे. नागरिकांचे मृत्यू, ते कुठेही झाले तरी ते निंदनीय आहे. आज ओलिसांना सोडल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मानवतावादी मदत वेळेवर आणि सातत्यपूर्ण पोहचणे आवश्यक आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध कोणतेही प्रादेशिक स्वरूप घेणार नाही याची खात्री करणे देखील महत्त्वाचे आहे.
डान्स करतानाचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, नीलम गोऱ्हेंनी दिले सखोल चौकशीचे आदेश
G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा उल्लेख
पीएम मोदी पुढे म्हणाले, “या एका वर्षात आपण वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर यावर विश्वास व्यक्त केला आहे. मतभेदांना दूर ठेऊन एकता आणि सहकार्य दाखवले आहे. तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही जेव्हा दिल्लीत आपण सर्वांनी एकमताने G20 मध्ये आफ्रिकन युनियनचे स्वागत केले होते. G20 ने संपूर्ण जगाला दिलेला सर्वसमावेशकतेचा संदेश अभूतपूर्व आहे.”