Download App

Narendra Modi यांच्याकडून चंदनाची बुद्ध मूर्ती भेट… जपानच्या पंतप्रधानांनी दिले हिरोशिमा शिखर परिषदेचे निमंत्रण!

नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना याप्रसंगी कर्नाटक येथील कदमवुड जाली बॉक्समधील चंदनाची बुद्ध मूर्ती भेट म्हणून दिली. तेव्हा फुमियो किशिदा यांनी पंतप्रधान मोदी यांना G-7 हिरोशिमा शिखर परिषदेचे जपान भेटीचे निमंत्रण दिले. मोदी यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे.

जपानचे पंतप्रधान या दोन दिवसाच्या दौऱ्यात जवळपास २७ तास होते. यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर एका थिंक टॅंक कार्यक्रमात मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठीच्या त्यांच्या योजनांचे अनावरण केले आहे. भारत आणि जपान हे दोन देश चीनच्या आव्हानांचा सतत सामना करत आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि लढाख या भागावर आपला हक्क सांगत आहे, तर जपानच्या सेनकाकू या भेटावर देखील चीन हक्क सांगत आहे. त्यादृष्टीने चीनबरोबर कशा पद्धतीने आपली भूमिका ठेवायची, अशी देखील भारत आणि जपान या दोन देशात झाली.

Jayant Patil : देवस्थानच्या जमिनी लाटल्या जातात… सरकार बघ्याच्या भूमिकेत!

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या वर्षभरात पंतप्रधान किशिदा यांना अनेक वेळा भेटलो आहे. तेव्हा-तेव्हा भारत-जपान द्विपक्षीय संबंधाबद्दलची वचनबद्धता आणि सकारात्मक भावना जाणवली. किशिदा यांची दोन दिवसीय भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार आहे.

कर्नाटक येथील कदमवुड जाली बॉक्समधील चंदनाची बुद्ध मूर्ती ही एक उत्कृष्ट भारतीय प्राचीन शिल्प आहे. कर्नाटक राज्यात वर्षानुवर्षे प्रचलित आहे. या मूर्तीचे शिल्प सुगंधि चंदनाच्या विशेष डिझाईनमध्ये तयार केले जात आहे. त्यातून मूर्ती आणि अन्य सजावटी साहित्य बनवले जात आहे.

follow us