Sansad Ratna Award 2025 : लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून (Award) प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या संसदरत्न पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यात महाराष्ट्राने बाजी मारली असून, त्यामध्ये सात जणांचा समावेश आहे. उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहेत.
कुणा-कुणाला पुरस्कार जाहीर?
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना शिंदे गटाचे मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर भाजपच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार हिना गावित आणि काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना संसद महारत्न पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. संसदरत्न पुरस्कार शिंदे गटाचे कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर झाला आहे. भाजपचे नेते सुकांत मजूमदार आणि सुधीर गुप्ता यांनाही पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. तर काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा यांचाही आज सन्मान केला जाणार आहे.
संसदरत्न पुरस्काराचं आज वितरण
यंदाचे संसदरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्राईम पॉइंट फाउंडेशन मार्फत दिल्या जाणाऱ्या संसद रत्न पुरस्कारांचं आज वितरण होणार आहे. राजधानी दिल्लीत हा कार्यक्रम होतो आहे. महाराष्ट्रातील पाच खासदारांचा या पुरस्काराने सन्मान होणार आहे. तर पश्चिम बंगालच्या काँग्रेस खासदाराचाही यात समावेश आहे. या खासदारांना आज पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.
पुरस्काराची पार्श्वभूमी
भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आग्रहाखातर प्राइम प्वाइंट फाउंडेशनने हा पुरस्कार सुरू केला. २०१० ला या पुरस्काराचे अब्दुल कलाम यांनी उद्घाटन केले. दरवर्षी संसदेत आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरी सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात.