Download App

Video : शिमल्यात मशि‍दीवरून सुरू असलेला वाद चिघळला; पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज

शिमल्यातील संजौली भागात एका मशिदीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा दावा करत काही संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे.

  • Written By: Last Updated:

Shimla Mosque Protests : शिमल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून एका मशि‍दीवरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिमल्यातील संजौली भागातल्या एका मशि‍दीवर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून, ती पाडण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी आज हिंदू संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला होता. (Protests) मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर आंदोलक व पोलिसांमध्ये आज सकाळी वाद झाला. परिणामी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यावेळी संजौली भागातली परिस्थिती तणावपूर्ण झाली.

video : भारतातील आरक्षण केव्हा संपणार?, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच मोठ विधान

नेमकं प्रकरण काय?

संजौली भागातल्या एका मशि‍दीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा दावा काही हिंदू संघटनांनी केला होता. त्यावरून तीव्र भावना व्यक्त होऊ लागल्या होत्या. हे बांधकाम पाडण्यात यावं, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. आपल्या मागण्यांसाठी शिमला विधानसभेच्या जवळच असणाऱ्या चौरा मैदानात हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, परवानगी नसताना मोर्चा निघाल्यामुळे पोलिसांनी आज सकाळी आधी आंदोलकांना माघार घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतरही आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. तसंच, पाण्याचा तीव्र मारा आंदोलकांवर करण्यात आला.

कायद्यानं निर्णय

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी लोकांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं विधान केलं होतं. मात्र, आंदोलनादरम्यान, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होता कामा नये, असंही ते म्हणाले होते. स्थानिक न्यायालयामध्ये मशीदीतील बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावर सुनावणी झाली असून कायद्यानुसार या प्रकरणाचा निर्णय घेतला जाईल, असं सुखू यांनी नमूद केलं होतं.

Himachal Cloud Burst: शिमला-कुल्लूत आकाश फाटले ! पन्नासहून अधिक लोक बेपत्ता

अतिरिक्त मजल्याचं बांधकाम

या प्रकरणामुळे संजौली व आसपासच्या भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश धुडकावून जमावाने मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी कारवाई केल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. या मशीदीमध्ये बेकायदेशीररीत्या अतिरिक्त मजल्याचं बांधकाम करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. याचा निषेध म्हणून काही हिंदू संघटनांनी बंदचं आवाहनही केलं होतं.

follow us

संबंधित बातम्या