मोठी बातमी! राहुल गांधींच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन, दिल्लीत वातावरण तापलं

राहुल गांधीच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाली आहे. मोदी यांच्या निवासस्थानावर ठिय्या मांडलेला आहे.

News Photo   2026 07 21T161408.464

मोठी बातमी! दिल्लीत वातावरण तापलं, राहुल गांधींच्या नेतृत्वात पंतप्रधा निवासासमोर आंदोलन

दिल्लीच्या जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. या आंदोलात देशभराती तरुण सामील झाले आहेत. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा सीजेपी तसेच इतर आंदोलकांनी घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद थेट संसदेतही उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा मुद्दा विरोधक संसदेत उपस्थित करताना दिसत आहेत.

विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असतानाच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच विरोधी पक्षातील बडे नेते जंतर-मंतरवर जाणार आहेत. हे सर्व महत्त्वाचे नेते सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह इतरही आंदोलकांची भेट घेणार आहेत.

गृहमंत्र्यांसह मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरुन राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

समोर आलेल्या माहितीनुसार सध्या विरोधी बाकावरील काँग्रेस तसेच इतर पक्षाच्या नेत्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलकांची भेट घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर नेते हे जंतर-मंतरच्या दिशेने निघाले आहेत. यावेळी सत्ताधारी मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. जंतर-मंतरच्या दिशेने जात असताना राहुल गांधी, प्रियंका गांधी तसेच इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडल्याचे पाहायला मिळाले.

एकीकडे हे बडे नेते आक्रमक झाल्याचे दिसताच दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाली आहे. मोदी यांच्या निवासस्थानावर ठिय्या मांडलेला असतानाच काही नेत्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. यात काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या भूमिकेवरही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांची गुंडागर्दी सुरू आहे, असा आरोप या आंदोलक नेत्यांकडून केला जातोय.

दुसरीकडे खासदार शरद पवार हे जंतर-मंतरवर पोहोचले असून त्यांनी अभिजित दीपके यांची भेट घेतली आहे. त्यांनी दीपके यांना काय मदत हवी आहे, अशी विचारणा केली आहे. अभिजित दीपके आणि शरद पवार यांच्यात बराच वेळ संवाद झाला असून दीपके यांनी पोलिसांनी किती अन्याय केला, याबाबतची माहिती पवार यांना सांगितली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version