Download App

Lok Sabha : संसदेबाहेरही धुराचे लोळ! लातूरचा तरुण दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

Lok Sabha Security Breach : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचा धक्कादायक प्रकार (Security Breach in Lok Sabha) समोर आला आहे. लोकसभा सभागृहात कामकाज सुरू असताना दोन जण आत घुसले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. या घटनेने मोठी खळबळ उडाली (Lok Sabha Security Breach)असून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुरक्षा व्यवस्था भेदून दोघे जण सभागृहात घुसले. त्यांनी खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धाव घेतली. यानंत त्यांना ताब्यात घेण्यात आले.

त्याच दरम्यान, लोकसभेबाहेर कलर स्मोकच्या नळकांड्या घेऊ आंदोलन केल्याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील असल्याचे समजते. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेलाही ताब्यात घेतले असून हरियाणातील हिस्सार येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, संसदेवर झालेल्या हल्ल्याला आजच 22 वर्षे पूर्ण झाली आहेत नेमक्या याच दिवशी या घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Video : संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक; कामकाजावेळी तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांतील एक तरुण महाराष्ट्रातील रहिवासी आहे. हे दोघेजण संसदेबाहेरील ट्रान्सपोर्ट भवन येथे आंदोलन करत होते. या दोघांकडे कलर स्मोक होते. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा तपास दिल्ली पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

संसदेबाहेर आणखी दोघा जणांनी गोंधळ घातल्याची माहिती मिळाली. यापैकी एक महिला आहे. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी त्यांनी संसदेबाहेर रंगीत धूर सोडला होता. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. या दोघांपैकी एक जण महाराष्ट्रातील तर दुसरी 42 वर्षीय महिला ही हरियाणातील हिस्सार भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप या घटनेतील संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.

पुन्हा चुकला काळजाचा ठोका! संसदेत घुसलेल्या तिघांमुळे 21 वर्षांपूर्वीच्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या

Tags

follow us