पंजाब हादरले! अमृतसर मंदिराजवळ 30 तासांमध्ये दुसरा बॉम्ब स्फोट

Amritsar Blast :  अमृतसरमध्ये श्री हरमंदिर साहिबजवळील सारागढी पार्किंगजवळ शनिवारी रात्री उशिरा झालेल्या स्फोटाची चौकशी सुरूच होती, की सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सुमारे 30 तासांत दुसरा स्फोट झाल्याने लोकांमध्ये भिती पसरली आहे. पहिला स्फोट झाला तिथेच दुसरा स्फोटही झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 08T104657.913

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 08T104657.913

Amritsar Blast :  अमृतसरमध्ये श्री हरमंदिर साहिबजवळील सारागढी पार्किंगजवळ शनिवारी रात्री उशिरा झालेल्या स्फोटाची चौकशी सुरूच होती, की सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सुमारे 30 तासांत दुसरा स्फोट झाल्याने लोकांमध्ये भिती पसरली आहे. पहिला स्फोट झाला तिथेच दुसरा स्फोटही झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सुमारे १० ते १५ मिनिटे या धुरातून वास येत होता. त्याचवेळी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. यादरम्यान स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात स्फोटानंतर धुराचे लोट हवेत उठताना दिसत आहेत. एडीसीपी सिटी-1 डॉ. मेहताब सिंग आणि एसीपी सेंट्रल सुरिंदर सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

https://letsupp.com/national/mig-21-crash-iaf-mig-21-crashes-in-rajasthan-rescue-op-underway-43573.html

दरम्यान, शनिवारी रात्री उशीरा श्री हरमंदिर साहिबजवळील सारागढी पार्किंगजवळ अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे सारागढी पार्किंगच्या काचेच्या काचा फुटल्या आणि बेंचवर झोपलेल्या तरुणासह तीन जण किरकोळ जखमी झाले. रविवारी, तपासादरम्यान, स्थानिक फॉरेन्सिक टीमला तेथून 5-7 तुकडे (पार्टिकल) सापडले, ज्याच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोहालीहून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे. या स्फोटात तीन जण जखमी झाल्याची माहिती डीसीपी परमिंदर सिंह भंडाल यांनी दिली आहे. यासोबतच याबाबत तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Karnataka Elections : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, शेवटच्या दिवशी दिग्गज नेते मैदानात

Exit mobile version