ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, दिल्लीत पुन्हा विरोधकांचे आंदोलन; राहुल – प्रियंका पोलिसांच्या ताब्यात

Rahul Gandhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा विरोधी पक्ष दिल्लीत आंदोलन करत

Rahul Gandhi Protest

Rahul Gandhi Protest

Rahul Gandhi Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा विरोधी पक्ष दिल्लीत आंदोलन करत असून दिल्ली पोलिसांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं आहे. आज दुपारी  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या खासदारांनी ‘सागर रत्न’ रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. यानंतर राहुल गांधींनी जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आणि सर्व विरोधी पक्षांचे खासदार तिथे जाण्यासाठी बसमध्ये बसले. मात्र, पोलिसांनी बस अडवल्याने राहुल आणि इतर विरोधी पक्षनेते रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले. खासदार प्रियंका गांधी यांनी रस्त्यावर बसून ठिय्या मांडून आंदोलनाची सुरुवात केली.  यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतलं.

माध्यमांशी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, आम्हाला काल निवडणूक आयोगाला (EC) भेटायचे होते. त्यांनी आम्हाला भेट दिली नाही. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आम्हाला अडवले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यासह अमित शहावर देखील जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी देशातील लोकशाही नष्ट केल्याचा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. तर मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी केली. तर माझ्यावर 45 एफआयआर दाखल झाले आहेत. माझे लक्ष्य 100 चे आहे. माझ्यावर 100 एफआयआर दाखल व्हावेत अशी माझी इच्छा आहे. आपल्यावर दाखल झालेला प्रत्येक एफआयआर हा पदकासारखा आहे असं देखील यावेळी राहुल गांधी म्हणाले.

आम्ही घाबरणार नाही – मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की , आम्ही घाबरणार नाही. आम्ही निवडणूक आयोगाविरुद्ध आंदोलन सुरूच ठेवू आणि आमचा संदेश संपूर्ण देशापर्यंत पोहोचवू. लोकशाही नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

मनोज जरांगे आता टेंडर योद्धा; अजय बारस्कर भडकले

Exit mobile version