Download App

Video : तेव्हा भाजप नेते अरुण जेटलींनी मला धमकावलं; राहुल गांधींचा आरोप, भाजपकडून प्रतिउत्तर

दिल्लीतील विज्ञान भवन येथे काँग्रेसकडून राष्ट्रीय कायदेशीर परिषदचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये राहुल गांधी बोलत होते.

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi on Arun Jaitley : दिल्लीत विज्ञान भवन येथे काँग्रेसने राष्ट्रीय कायदेशीर परिषदचे आयोजन केलं. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात कृषी कायद्यांबद्दल बोलताना (Gandhi) दिवंगत माजी मंत्री अरुण जेटली यांच्यावर गंभीर आरोप केला. शेतकरी आंदोलनादरम्यान अरुण जेटली यांना धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांच्या या दाव्यानंतर अरुण जेटली यांच्या मुलाने प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी मतांवरून कोणालाही धमकावणं माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हतं असं रोहन जेटली म्हणाले आहेत. देशाच्या शेती क्षेत्रात संबधित तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यात आले होते. शेतकऱ्याकंडून दिल्लीच्या वेशींवर वर्षभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये ११ बैठका झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे दहा महिन्यांनी केंद्र सरकारने कायदे रद्द केले होते.

मला आठवतय जेव्हा मी कृषी कायद्यांविरुद्ध लढत होतो, तेव्हा अरुण जेटलीजींना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. त्यांनी मला सांगितलं की जर मी सरकारला विरोध करत राहिलो आणि कृषी कायद्यांविरुद्ध लढत राहिलो तर आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. त्यानंतर मी त्यांच्याकडं पाहिले आणि म्हटलं की मला वाटत नाही की तुम्हाला माहिती नसेल, की तुम्ही कोणाशी बोलताय, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

तुम्ही कुठही जा तुम्हाला सोडणार नाही; निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांचा पुन्हा घणाघात

दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपानंतर माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांनी एक्स पोस्टवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. “राहुल गांधी आता दावा करतात की माझे दिवंगत वडील अरुण जेटली यांनी त्यांना शेती कायद्यांवरून धमकावले होते. मी त्यांना आठवण करून देतो की, माझ्या वडिलांचे २०१९ मध्ये निधन झाले. शेती कायदे २०२० मध्ये लागू करण्यात आले असं उत्तर त्यांनी दिलं.

त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे, विरोधी मतांवरून कोणालाही धमकावणं माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हतं. ते एक कट्टर लोकशाहीवादी होते आणि नेहमीच एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवायचे. जर अशी परिस्थिती उद्भवली असती, जसं राजकारणात अनेकदा होतं, तर त्यांनी तोडगा काढण्यासाठी सर्वांना चर्चेला बोलवलं असतं. आपल्यासोबत नसलेल्यांबद्दल राहुल गांधी जाणीवपूर्वक बोलले तर मला आवडेल. त्यांनी मनोहर पर्रिकरजींसोबतही असेच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता, असं रोहन जेटली म्हणाले आहेत.

follow us