Download App

video : बॅरिकेट्स तोडून थेट स्टेजवर पोहचली गर्दी; गोंधळ उडताच राहुल-अखिलेश हे भाषण न करताच निघून गेले !

Rahul Gandhi आणि अखिलेश यादवांची संयुक्त सभा होती. मात्र यामध्ये मोठा गोंधळ झाल्याने दोन्ही नेत्यांना सभा न घेताच काढता पाय घ्यावा लागला आहे.

Rahul Gandhi and Akhilesh Yadav Return without meeting due crowd out of control : लोकसभेच्या निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यातील प्रचारासाठी देशभरात सर्वच पक्षांची चुरस बघायला मिळत आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशमधील फुलपुर या ठिकाणच्या समाजवादी पार्टीच्या उमेदवारासाठी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) आणि अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) त्यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेमध्ये मोठा गोंधळ ( crowd out of control ) झाल्याने या दोन्ही नेत्यांना सभा न घेताच काढता पाय घ्यावा लागला आहे.

नैऋत्य मान्सूनची सुरुवात! 31 मे’पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर दाखल; दिल्लीला प्रतिक्षाच

या सभेमध्ये मोठी गर्दी झाली. तर नियंत्रणा बाहेर गेलेल्या गर्दीने सभास्थळावरील बॅरिकेट्स तोडून थेट मंचावर धाव घेतली. ज्यामध्ये माईक तुटला, वीज पुरवठा देखील खंडित झाला. या दोन्हीही नेत्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात येण्याची वाट पाहिली. मात्र गर्दी आणि गोंधळ नियंत्रणात न आल्याने अखेर या दोन्ही नेत्यांना सभा न घेताच काढता पाय घ्यावा लागला आहे.

फुलपुर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीचे उमेदवार अमरनाथ सिंह मौर्य यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र अनियंत्रित गर्दीमुळे उडालेला गोंधळ पाहता या दोन्ही नेत्यांनी भाषण न करताच या ठिकाणहून पुढील सभेच्या ठिकाणी रवाना झाले.

इतकी ताकद सिसोदियांसाठी लावली असती तर…; स्वाती मालीवाल यांचा केजरीवालाना टोला

या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या गर्दीमध्ये अनेक कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधी जखमी झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. तर ही सभा रद्द झाल्यानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी अलाहाबाद लोकसभा मतदारसंघासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार उज्वल रमण सिंह यांच्या प्रचारार्थ सभा घेतली ही सभा मुंगारी या गावात पार पडली या ठिकाणी दोन्ही नेत्यांनी सभेला संबोधित केलं.

follow us