Rahul Gandhi On Dharmendra Pradhan : नीट पेपर फुटी प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी दिल्लीतील जंतर – मंतर मैदानात हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणावरुन लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर देखील आंदोलन केले आहे. तरआता पत्रकार परिषद घेत त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.
माध्यमांशी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, पंतप्रधान मोदी (PM Modi) धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा घेणार नाही. मोदी सरकार त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचे खाते बदलण्याचा विचार करत आहे असं माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले. तसेच मोदी सरकार तरुणांचे भविष्य धोक्यात आणणाऱ्यांना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप देखील माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी केला.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, हे भारताच्या विद्यार्थ्यांना मान्य नाही. हे कोणालाही मान्य नाही. याचे कारण म्हणजे प्रधान हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत आणि भारताच्या मुलांच्या भविष्याची जी दुर्दशा झाली आहे, त्याचे ते प्रतीक आहेत. ते या देशाच्या सर्वात मौल्यवान संपत्तीचा म्हणजेच आपले विद्यार्थी आणि त्यांचे भविष्य विनाश दर्शवतात. त्यामुळे, धर्मेंद्र प्रधान यांची इकडे-तिकडे अदलाबदल करण्याबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे असं राहुल गांधी म्हणाले.
मोदी जी, अपने “फ्रैंड” को एक मंत्रालय से हटाकर दूसरे में बैठाकर बचाने की आपकी साज़िश देश के छात्रों और भारत की जनता को मंज़ूर नहीं।
धर्मेंद्र प्रधान भ्रष्टाचार और देश की education system की बर्बादी के चिन्ह और अनेक छात्रों की मौतों के ज़िम्मेदार हैं।
उन्हें अब किसी और की… pic.twitter.com/tVesZvNu3m
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 25, 2026
तर यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या रिलबाबत देखील प्रतिक्रिया देत जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, भारताचे पंतप्रधान जे रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ बनवण्यात व्यस्त असतात. काल त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि म्हणाले, आम्हाला काही खूप चांगल्या सूचना मिळाल्या आहेत. याचा सूचनांशी काहीही संबंध नाही. त्यांची मागणी सूचनांची नाही त्यांची मागणी धर्मेंद्र प्रधान जे या प्रकरणाचे प्रमुख आहेत त्यांना पदावरून हटवण्याची आहे. विद्यार्थ्यांना मारहाण झाली, त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांचा अपमान केला गेला, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे.
Ebenezer: A Christmas Carol मध्ये जॉनी डेप दिसणार एबेनेझर स्क्रूजच्या भूमिकेत, ट्रेलर प्रदर्शित-
भूतकाळ कधीही भविष्याशी लढू शकत नाही
राहुल गांधी पुढे म्हणाले, ही तीच व्यवस्था आहे जी त्यांच्यावर (विद्यार्थी आणि तरुणांवर) हल्ला करत आहे. आतमध्ये मी त्यांना नेमके हेच सांगितले… मी म्हणालो, ‘काळजी करू नका… भारत सरकारची संपूर्ण ताकद. सरकारमधील प्रत्येक व्यक्ती सुद्धा तुम्हाला तिथून (आंदोलनाच्या ठिकाणाहून) हटवू शकत नाही. त्यांना (सरकारला) जे काही करायचे आहे ते करू द्या. त्यांना जर थांबवायचे असेल किंवा धमकावायचे असेल, तर ते काहीही करू शकतात पण आम्ही मागे हटणार नाही. ते (विद्यार्थी) भारताचे भविष्य आहेत कोणीही त्यांच्याशी लढू शकत नाही. नरेंद्र मोदी भारताच्या भूतकाळाचे प्रतिनिधित्व करतात. भूतकाळ कधीही भविष्याशी लढू शकत नाही.
