Rahul Gandhi launches a scathing attack on BJP for Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीचे राजकीय गणित अचानक बदलले आहे. कारण येथे काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान फेटाळण्यात आला.निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद शर्मायांनी भाजपची हरकत मान्य करत नटराजन यांचा नामांकन अर्ज रद्द केला.भाजपचा आरोप होता की, तेलंगणामधील प्रलंबित असलेल्या एका प्रकरणाची माहिती मीनाक्षी नटराजन यांनी आपल्या नामांकन अर्जात नमूद केली नव्हती. याच कारणावरून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला.दरम्यान, काँग्रेसने हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा केला असून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या मते, आवश्यक संख्याबळ नसतानाही राज्यसभेची तिसरी जागा जिंकण्यासाठी भाजपने हा संपूर्ण डाव आखला असून ही एक राजकीय कटकारस्थानाची कृती आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी
देशातील राज्यसभा निवडणूक ही सुरू होण्याअगोदरच संपली आहे. कारण या निवडणुकीत भाजपने थेट सीट चोरी केली आहे. जे अगोदर मत चोरी आणि सरकार चोरी करत होते. या राज्यसभा निवडणुकीमध्ये तर काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांनी सर्व कागदपत्रे व्यवस्थित सादर केली होती. त्यांच्यावर कोणतेही प्रलंबित खटले नव्हते तरी देखील भाजपने घेतलेल्या एका क्षुल्लक आक्षेपावरून निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे.
After Vote Chori and Sarkar Chori – the BJP-EC jugalbandi has finished the contest before it has even begun with Seat Chori.
Look at what happened in the recent Rajya Sabha elections.
Congress candidate Meenakshi Natarajan ji submitted every document. No pending cases. The EC…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 11, 2026
मात्र दुसरीकडे भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार परिम नाथवाणी यांनी अर्जावर स्वत:चे नाव चुकीचे लिहिले होते. त्यांनी अनिवार्य माहिती देणे देखील टाळले होते. तरीही निवडणूक आयोगाने त्यांना सुधारणा करण्यास मुदत दिली. पण त्याच निवडणूक आयोगाने नाटराजन यांना वेगळा न्याय दिला आहे.सुरूवातीला आयोगाने आम्हाला टाळले मात्र भेट घेतली तेव्हा त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही.
मोहिते पाटलांसाठी विमानातून उडी मारली पण..,; सोलापुरात उत्तम जानकर-मोहिते पाटील संघर्ष पेटला…
त्यामुळे भविष्यात देखील हे प्रकार आणखी घडताना दिसतील कारण भाजपला निवडणुका जिंकण्यापेक्षा त्या मॅनेज करणं आणि आपल्याा सोयीनुसार वळवणं जास्त सोपं आहे. असं म्हणत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्जबाद झाल्याच्या मुद्द्यावरून भाजपला खडेबोल सुनावले आहे.
