Rahul Gandhi On GST : पुढील महिन्यात कर्नाटकातील (Karnataka)विधानसभा निवडणूक (Assembly Elections)होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress)नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)सातत्याने राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुल यांनी सोमवारी बेळगाव (Belgaon)येथील रामदुर्ग येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी थेट केंद्र सरकारवर (Central Govt) हल्लाबोल केला. त्याचवेळी राहुल गांधींनी सांगितलं की, कॉंग्रेसचं सरकार आल्यास जीएसटी (GST)हटवणार असल्याचीही घोषणा केली आहे.
रिंकू सिंगने केली विराट कोहलीची मिमिक्री, शुभमनला हसू आवरेना
राहुल गांधी म्हणाले की, आजकाल सरकारचे लक्ष फक्त 10-12 अब्जाधीशांवर आहे, पण शेतकरी, मजूर आणि छोटे विक्रेत्यांची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल म्हणाले की, कोट्यधीशांना बँकेतून सहज कर्ज मिळते आणि काही झाले तर ते सहज माफ होते, पण शेतकऱ्यांचे कर्ज कधीच माफ होत नाही.
#WATCH| Karnataka: "Nowadays, focus is only on 2-3 billionaires, but it should be on farmers, labourers and small vendors….billionaires get loan from bank easily & if something happens, it gets waived off easily but farmers loans are never waived off": Rahul Gandhi, Congress… pic.twitter.com/AcVTuDLra1
— ANI (@ANI) April 24, 2023
जीएसटीबाबतही राहुल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. जीएसटी फक्त श्रीमंतांना लाभ देण्यासाठी आणण्यात आल्याचे राहुल म्हणाले. जीएसटी समजणे इतके अवघड आहे की, लोकांना ते भरता येत नाही. अनेकांना ते कधी आणि कसे भरायचे हेच समजत नाही, अशीही टीका यावेळी केली आहे.
राहुल म्हणाले की, मोठ्या उद्योगांना अकाउंटंट असतात, पण छोट्या व्यापाऱ्यांकडे अकाउंटंट नसतात. त्यामुळे ते कर भरू शकत नाहीत आणि त्यांचे धंदे बंद पडले आहेत. केंद्रात आमचे सरकार आल्यास आम्ही जीएसटी हटवू अशी घोषणाही यावेळी राहुल गांधींनी सभेत केली आहे.