Download App

भारतातील ट्रक ड्रायव्हर्सना येणार सोन्याचे दिवस? राहुल गांधींनी केला अमेरिकेत अभ्यास

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi Truck Journey : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा ट्रकमधून प्रवास करतांनाचा फोटो व्हायरल झाला होता. आताही राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्रकमधून प्रवास केला. सध्या ते अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी अलीकडेच वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क (Washington to New York) असा १९० किलोमीटरचा प्रवास ट्रकमधून केला. यादरम्यान त्यांनी ट्रकचा चालक तेजिंदर गिल (Tejinder Gill) यांच्याशी अनेक विषयांवर गप्पाही मारल्या. त्यांनी या गप्पांचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रवासादरम्यान गप्पा मारतांना ट्रक चालकाच्या मासिक कमाईबाबतही राहुल यांनी त्यांना विचारले. ट्रक चालक तेजिंदर गिल यांनी त्यांची महिन्याची कमाई सांगितली तेव्हा राहुल गांधीही कमाईचा आकडा ऐकून अवाक झाले. (Rahul Gandhi truck journey, they asked truck driver How Much Do You Earn?)

राहुल गांधी यांनी यापूर्वी पंजाबमध्येही ट्रक ट्रिप केली होती. तेव्हा त्यांनी अमृतसरमधील ट्रक चालकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आता राहुल गांधी अमेरिकेत ट्रकमधून प्रवास करतांना दिसले. ट्रक चालकाच्या शेजारील सीटवर बसून राहुल यांनी हा प्रवास केला. यावेळी राहुल गांधी ट्रकमधील सोयी सुविधा पाहून थक्कच झाले. ते म्हणाले, अमेरिकेचे ट्रक भारतापेक्षा खूपच आरामदायी आहेत. ड्रायव्हरच्या सोयी लक्षात घेऊन हे बनवले आहेत. भारतातील ट्रक हे इतके आरामदायी नसतात. यावर तेजिंदर गिल यांनी सांगितले की, हा मॅन्यूफॅक्चरिंगचा भाग आहे…. यावेळी गिल यांनी सांगितेल की, अमेरिकेत ट्रक ड्रायव्हर्संची काळजी घेतली जाते. इथं ट्रकही चोरी जात नाहीत. पोलिसही ट्रकचालकाला त्रास देत नाहीत. मात्र, जास्त वेगात ट्रक पळवला तर चालान निश्चितपणे कापले जाते.

राहुल यांनी विचारले, तुम्ही किती कमावता?

यावर ड्रायव्हर तेजिंदर गिल यांनी सांगितले की, जर तुम्ही अमेरिकेत गाडी चालवलीत तर एका महिन्यात ४-५ लाख रुपये सहज कमावता येतील. ट्रक ड्रायव्हर ८-१० हजार डॉलर्स आरामात कमावतो. म्हणजेच भारतानुसार तुम्ही एका महिन्यात ८ लाख रुपये कमवू शकता. हे ऐकून राहुल गांधींना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, महिन्याला…. तर गिल म्हणाले, हो, महिन्याला दरमहा ८ लाख रुपये. या उद्योगात खूप पैसा आहे. ज्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे.

भारतातील ट्रक चालकांना काय संदेश द्यायचा?

यावर तेजिंदर म्हणाले, तुम्ही लोक खूप हार्ड वर्क करत आहात. खूप मेहनत करत आहात. कुटूंबापासून दूर राहा. इथं ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला होतो. पण भारतात ट्रक चालवल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही.

राहुल पुढे सांगतात की, भारतात आणखी एक गोष्ट आहे, तिथे ट्रक ड्रायव्हरकडे ट्रक नसतो, तो ट्रक दुसऱ्याचा असतो.

यावर चालक म्हणतो की येथे कोणाकडे पैसे नाहीत. डाउन पेमेंट करून, कर्ज घेऊन ट्रक घेतला जातो. आणि भारतात मालमत्तेची कागदपत्रे आवश्यक आहेत. गरिबांकडे मालमत्तेची कागदपत्रे नसतात. म्हणूनच ते कोणाचाही ट्रक चालवत राहतात.

राहुल यांनी ऐकले सिद्धू मुसेवालाचे गाणे
ड्रायव्हरने राहुलला विचारले तुम्ही गाणे ऐकणार का? यावर राहुल म्हणाले, हो लावा गाणं. सिद्धू मुसेवालाचे २९५ लावा. तेव्हा ड्रायव्हर म्हणतो, आमची विनंती आहे राहुलजी. सिद्धू मूसेवाला काँग्रेसचा कार्यकर्ते होता, त्याला न्याय मिळाला नाही. राहुल म्हणतो – हो, त्याचे गाणे वाजवा.

यानंतर राहुल गांधींनी ट्रकचालकासोबत नाश्ताही केला. यावेळी उपस्थित लोकांनी राहुलसोबत फोटोही काढले.

Tags

follow us