Rahul Gandhi on OBC : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी (OBC) दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित ‘भागीदारी न्याय संमेलनात’ बोलताना ओबीसी वर्गाच्या हक्क संरक्षणात युपीए सरकारकडून आणि स्वत:कडून काय कमी राहिली, याबद्दल खंत व्यक्त केली आहे. राजधानी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये काँग्रेस पक्षाने ओबीसी सहभाग महासंमेलन आयोजित केलं होतं. त्यामध्ये ते बोलत होते.
२००४ पासून मी राजकारणात आहे आणि मला यात २१ वर्षे झाली आहेत. मी जेव्हा मागं वळून पाहतो तेव्हा मी माझ्या कामाचं आत्मविश्लेषण करतो आणि यातच काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. एक विषयावर मी मात्र कमी पडलो. ते म्हणजे, ‘ओबीसी वर्गाचे संरक्षण आपल्याला ज्या प्रकारे करायला हवं होतं, त्या प्रकारे केलं नाही,’ याचं कारण असं होतं की, या मुद्द्यांची मला खोलवर समज नव्हती. हे मला आधीच समजलं असतं तर त्याचवेळी जातीय जणगणना केली असती. मला आता ही चूक सुधारायची आहे आणि ती मी सुधारणार आहे असं ते म्हणाले आहेत.
कांग्रेस सरकारमध्ये जातीय जनगणना न करणं ही माझी मोठी चूक होती. जर त्यावेळी ओबीसींच्या समस्या आणि अडचणींची जाणीव झाली असती, तर तातडीने जातीय जनगणना केली असती. मला ती चूक आता सुधारायची आहे. राहुल गांधी यांनी या ओबीसी संमेलनात बोलताना युपीए सरकारने कोणती कामं चांगल्या प्रकारे यावरही भर दिला. जमीन अधिग्रहण बिल, मनरेगा, अन्नाचा अधिकार, ट्रायबल बिल आणि नियामगिरीची लढाई यांसारख्या विषयांवर भर दिला आहे. ज्यासंदर्भातील कामं त्यांच्या सरकारने योग्य रीतीने केल्याचं राहुल गांधींनी नमूद केलं.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून मत चोरी; काँग्रेस नेते राहुल गांधींचा पुन्हा गंभीर आरोप
त्याचबरोबर दलित, आदिवासी आणि महिलांच्या मुद्द्यांवरही युपीएने चांगलं काम केलं असून तिथे तर मला मला चांगले गुण मिळावे असंही ते म्हणाले आहेत. १० ते १५ वर्षांपूर्वी दलित लोकांसमोर ज्या अडचणी होत्या, त्या मला समजल्या होत्या. पण ओबीसींच्या अडचणी अधिक लपलेल्या होत्या. त्यामुळे, त्यावेळी त्यांच्या समस्यांची जाणीव झाली असती, तर जातीय जनगणना केली असती, असं गांधी स्पष्ट म्हणाले. ‘भागीदारी न्याय संमेलना’त राहुल गांधी यांनी देशातील दलित, मागास, आदिवासी आणि अल्पसंख्याक वर्गांची एकत्रित लोकसंख्या सुमारे ९० टक्के असल्याचं यावेळी सांगितलं.
त्यासोबतच त्यांनी अशीही खंत व्यक्त केली की, अर्थसंकल्प तयार झाल्यावर जेव्हा ‘हलवा’ वाटला जातो, तेव्हा या ९० टक्के लोकांचा त्यात सहभाग नसतो. ‘देशाची ९० टक्के लोकसंख्या ही उत्पादकता बाळगणारी शक्ती आहे. हलवा बनवणारे लोक तुम्ही (ओबीसींना उद्देशून) आहात, पण हलवा ते खात आहेत. आम्ही हे नाही म्हणत की, त्यांनी हलवा खाऊ नये, पण कमीत कमी तुम्हाला पण तो मिळाला पाहिजे,’ असे म्हणत राहुल गांधींनी सरकारला घेरलं. यावेळी त्यांनी राजकारणावर भाष्य केलं. नरेंद्र मोदी हा काही मोठा प्रॉब्लेम नाही. तो मीडियाने मोठा केला आहे. मी त्यांना भेटलो आहे काही फार विशेष नाही असा टोलाच राहुल यांनी लगावला आहे.
#WATCH | Delhi: At Congress' 'Bhagidari Nyay Sammelan', Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "I have been in politics since 2004…When I look back, I can see that I made a mistake. I didn't protect the OBCs like I should have…It was because I could not understand your issues in… pic.twitter.com/uink9xyKFJ
— ANI (@ANI) July 25, 2025