Download App

कोणतीही किंमत मोजायला तयार, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : लोकसभा सदस्यत्व रद्द (Disqualified) झाल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. आपण भारताच्या आवाजासाठी लढत असून कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यांनंतर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. देशात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन केली जात आहेत.

आपल्या अपात्रतेनंतर आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.” लोकसभा सचिवलयाचा निर्णय येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करायला सुरुवात केली होती. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरील प्रोफाइल फोटो बदलला आहे.

ज्यांना आवाज ऐकायची सवय नसते तेच अशी कारवाई करतात; ठाकरेंचा हल्लाबोल

प्रियंका गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, “नरेंद्र मोदीजी, तुमच्या चमच्यांनी शहीद पंतप्रधानांच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर म्हटले. तुमच्या एका मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला की राहुल गांधींचे वडील कोण?

त्या पुढं म्हणाल्या की, काश्मिरी पंडितांच्या प्रथेनुसार, वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा पगडी घालतो, कौटुंबिक परंपरा कायम ठेवतो. संपूर्ण कुटुंबाचा आणि काश्मिरी पंडित समाजाचा अपमान करत तुम्ही पूर्ण संसदेत नेहरूंचे नाव का ठेवत नाही, असा सवाल केला. पण कोणत्याही न्यायाधीशाने तुम्हाला दोन वर्षांची शिक्षा दिली नाही. तुम्हाला संसदेतून अपात्र ठरवले नाही.

Tags

follow us