Video : राहुलजी, तुम्ही लग्न करा आम्ही वऱ्हाडी होऊ! लालूंची शाब्दिक कोटी अन् जोरदार हशा..

केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बेदखल करण्याची प्लॅनिंग करण्यासाठी आज (दि.२३) बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी देशातील १६ प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी पुढील बैठक शिमला येथे घेण्याचे ठरले. बैठकीतील या निर्णयाची माहिती […]

Lalu Prasad

Lalu Prasad

केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बेदखल करण्याची प्लॅनिंग करण्यासाठी आज (दि.२३) बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी देशातील १६ प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी पुढील बैठक शिमला येथे घेण्याचे ठरले. बैठकीतील या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मात्र एक खास किस्सा घडला ज्यामुळे उपस्थित सर्वच मंडळी जोरात हसू लागले.

घडले असे, की पत्रकार परिषदेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राहुल गांधी सध्या चांगले काम करत आहेत. पण आता त्यांनी दाढी कमी करायला हवी आणि लवकर लग्न करावे. आम्ही वर्हाडी म्हणून येऊ. असे लालू यादव यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

PHOTO : सनी देओलच्या मुलाची सासू आहे दुबईची मोठी बिझनेसवुमन, बॉलीवूड इंडस्ट्रीशीही तिचा संबंध

यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदी अमेरिकेत चंदनाचे लाकूड वाटत आहेत. आज वाढती बेरोजगारी काळजीत टाकणारी आहे आणि महागाई शिखरावर पोहोचली आहे. आता हनुमानजी आमच्यासोबत आहेत. आगामी काळात भाजपची अवस्था अतिशय वाईट होणार आहे. याचे कारण म्हणजे हनुमानजी आमच्यासोबत आहेत.

दरम्यान, या बैठकीत महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आदी उपस्थित होते.

Exit mobile version