Download App

पुन्हा अवकाळीचे संकट, महाराष्ट्र-कर्नाटकसह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

Weather Update: देशात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग फिरू लागले आहे. नुकतेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील 24 तासांत किनारपट्टी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील 4 दिवसांत केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस पडू शकतो. असा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.

राज्यात पावसाची शक्यता
शुक्रवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आज शनिवार रोजी मुंबई, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी येथे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातच अनेक ठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि अंतर्गत ओडिशामध्ये कमाल तापमान 38-40°C च्या श्रेणीत आहे. तर, वायव्य भारत, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तापमान सामान्यपेक्षा 2-3 अंश सेल्सिअसने कमी होते, तर उर्वरित देशातील तापमान सामान्यच्या जवळपास होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर

दिल्लीतील परिस्थिती
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस दिल्ली-एनसीआरमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र, पावसाची फारशी शक्यता नाही. तापमानात हळूहळू वाढ होईल. शनिवारी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

मुंबईतील बेकायदा फिल्म स्टुडिओवर प्रशासनाचा बुलडोझर

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील 4 दिवसांत उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये तापमानात हळूहळू २-४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून, अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा आणि अंतर्गत भागात विस्तारण्याची शक्यता आहे. पुढील ४ दिवसांत देशातील कोणत्याही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.

वाहनधारकांसाठी खुशखबर: सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी घट

Tags

follow us