Download App

‘मी विधवा होईन, मग आपण लग्न करू’, राजला वचन… राजाचा घात; सोनमची खुनी खेळाची स्क्रिप्ट एकदा वाचाच

Raja Raghuvanshi Murder Sonam Confessed Crime : इंदौरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या (Raja Raghuvanshi Case) हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनी सोनमने (Sonam Bewfa Hai) तिचा पती राजा याची हत्या करण्याची संपूर्ण योजना आखली होती. तिचा प्रियकर राज कुशवाहाने ही योजना (Crime News) राबवण्यात सोनमला मदत केली.

राजा आणि सोनमचे लग्न

इंदौरमधील राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नी सोनम रघुवंशी यांना अटक केली आहे. इतर 4 आरोपींनाही अटक करण्यात आली (Sonam Raghuvashi) आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने तिच्या प्रियकरासह या गुन्ह्याचा संपूर्ण कट रचला होता. लग्नानंतर अवघ्या 5 दिवसांनी सोनमने राजा रघुवंशीच्या हत्येचं संपूर्ण प्लॅनिंग केलं होतं.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध खटला दाखल; कॅलिफोर्निया सरकारनं नेमकं काय केलं?

राजा आणि सोनमचे लग्न 11 मे रोजी झाले. कुटुंबात आनंद होता. सगळं काही व्यवस्थित चाललं असं दिसत होतं. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुनसार 16 मे रोजीच सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून राजाला संपवण्याचा कट रचला होता. सोनमने राज कुशवाहाला सांगितलं होतं की, आपण राजाला मारून लुटमारीची कहाणी बनवू. मग मी विधवा होईन आणि वडीलही आपल्या लग्नाला परवानगी देतील.

हत्येसाठी ऑनलाइन ऑर्डर केले हत्यार
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या हत्याराने राजाची हत्या करण्यात आली, ती गुवाहाटीहून ऑनलाइन मागवण्यात आली होती. घटनेपूर्वी आरोपी सोनमच्या होमस्टेपासून 1 किमी अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये राहत होते. सोनम त्यांना लोकेशन पाठवत होती. राजाची हत्या करण्यासाठी 50,000 रुपयांची सुपारी देण्यात आली होती.

धक्कादायक! 50 हत्ती कापणार, मांस घराघरात वाटणार; ‘या’ देशात निघालं फर्मान, कारण काय..

हत्येनंतर फिल्मी स्टाईलने पळाले
राजाची हत्या 23 मे रोजी झाली. त्याच संध्याकाळी सोनम शिलाँगहून गुवाहाटी पोहोचली. तिथून ती ट्रेन पकडली आणि वाराणसीमार्गे गाजीपूरला गेली. यावेळी तिने तिचा मोबाईल फोन तोडला जेणेकरून पोलिसांना तिचा शोध लागू नये. तपासादरम्यान सोनमचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले, ज्यामध्ये ती आरोपीशी बोलताना दिसली. त्यानंतर सीडीआर आणि कॉल ट्रेसिंगमुळे राज कुशवाहाचे इंदौरमधील स्थान उघड झाले आणि पोलिसांनी त्याला अटक केली. सोनमला ही बातमी कळताच तिला समजले की, खेळ संपला आहे. यानंतर ती यूपीमधील एका ढाब्यावर पोहोचली आणि आत्मसमर्पण केलं.

अखेर हत्येचं गूढ उकललं
सोनम आणि राजा रघुवंशी यांचे लग्न 11 मे रोजी झाले. दोघेही एका मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून संपर्कात आले. त्यानंतर सोनम आणि राजा हनिमूनसाठी मेघालयातील शिलाँगला गेले होते. येथे राजाची हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला. 17 दिवसांनी पोलिसांनी या हत्येचा गुन्ह्याचा उलगडा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राज कुशवाहाने सोनमला राजाची हत्या करण्यात खूप मदत केली. त्याने कॉन्ट्रॅक्ट किलर्सना कामावर ठेवले होते.

 

follow us