नवी दिल्ली : राजस्थानमध्ये अर्थसंकल्प (Rajasthan budget 2023)सादरीकरणादरम्यान प्रचंड निष्काळजीपणा पाहायला मिळाला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot ) यांनी जुने अर्थसंकल्पीय भाषण वाचल्याचा आरोप भाजपने केला आहे. गेहलोत शुक्रवारी त्यांच्या चालू कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत होते. यावेळी त्यांनी मागील अर्थसंकल्पातील घोषणा वाचून दाखवल्या.
त्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला. नंतर सीएम गेहलोत यांनी स्पष्टीकरण दिले की आपण चुकून जुने पान वाचले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी देखील मागितली. राजस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत अर्थसंकल्पाची जी प्रत सोपवण्यात आली होती त्यामध्ये काही पानं जुनीच होती. मुख्यमंत्र्यानी जुनंच भाषण वाचू लागले. तब्बल आठ ते दहा मिनिटं त्यांनी जुनाच अर्थसंकल्प वाचला. दरम्यान हा सर्व प्रकार विरोधी पक्षाच्या लक्षात आला आणि विरोधी पक्षातले आमदार हसू लागले.
त्याचवेळी राजस्थान सरकारमधील मंत्री महेश जोशी यांनी अशोक गेहलोत यांना आपण जुने बजेट वाचत असल्याचे सांगितले. मग कुठेतरी त्यांची चूक लक्षात आली. विरोधकांच्या गदारोळात अशोक गेहलोत यांनीही आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. मात्र विरोधकांचा गोंधळ थांबला नाही. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणाल्या, मुख्यमंत्री 8 मिनिटे जुना अर्थसंकल्प वाचत राहिले. मी मुख्यमंत्री असताना अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पुन्हा-पुन्हा तपासून पाहायचो आणि नंतर वाचायचो. तुम्ही कल्पना करू शकता की, जे जुने वाचतात. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हातात राज्य किती सुरक्षित आहे.
भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलने गेहलोत यांच्या व्हिडिओवर टिप्पणी केली, “काँग्रेस सरकारची आणखी एक ‘ऐतिहासिक चूक’! जेव्हा ‘सरकार’ जनतेकडे दुर्लक्ष करते आणि केवळ एका कुटुंबाच्या ‘सेवेसाठी’ स्वतःला वाहून घेते तेव्हा असे होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचत राहिले होते.