Download App

अहवाल आले, काँग्रेसचे टेन्शन वाढले! दोन नेत्यांतील वाद टाळण्यासाठी उद्या बैठक

Ashok Gehlot vs Sachin Pilot : राजस्थानात विधानसभा निवडणुकांच्या आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद मिटविण्याची तयारी काँग्रेसने (Congress) तयारी सुरू केली आहे. यासाठी उद्या (शुक्रवार) दुपारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री गेहलोत दुपारी दिल्लीत पोहोचतील.

राज्य सरकारच्या काही मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवाल पक्ष नेतृत्वाने मागितला आहे. त्यामुळे या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जातील अशी शक्यता व्यक्त होत आहे. आधी पक्ष प्रभारी रंधावा यांच्या अध्यक्षतेत बैठक होणार आहे. त्यानंतरज पक्ष नेतृत्वाबरोबर वन टू वन या पद्धतीने बैठक होण्याची शक्यता आहे.

New Parliament Inauguration: ऑस्ट्रेलियाहून परतताच पंतप्रधानांचा विरोधकांना एकजुटीचा मंत्र

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन पायलट यांना शांत करण्यासाठी पक्षाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. निवडणुकांच्या आधी पक्षाचे नुकसान होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. जर पायलट यांनी ऐकले नाही आणि आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलन केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. इतकेच नाही तर वेळप्रसंगी त्यांची पक्षातून हकालपट्टी देखील केली जाऊ शकते.

या बैठकीच्या आधी पार्टी संगठन, सरकार, मंत्री, आमदारांची वक्तव्ये आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबाबत विविध अहवाल काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडे पोहोचलेही आहेत. यामध्ये अनेक नेते, मंत्र्यांनी आपल्याच सरकारविरोधात केलेले आरोप आणि वक्तव्यांचे व्हिडीओंचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी अजमेर ते जयपूर अशी जनसंघर्ष यात्रा काढली होती. यानंतर झालेल्या सभेत त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे तीन मागण्या करत पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत या महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. 31 मे पर्यंत या मागण्यांवर कार्यवाही करण्याचा दबाव गेहलोत सरकारवर आहे.

दिल्लीतील आप नेते सत्येंद्र जैन तिहार जेलच्या बाथरूममध्ये पडले, प्रकृती गंभीर

जर या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर आंदोलन करण्याचीही घोषणा काँग्रेसच्याच आमदारांनी केली होती. पायलट यांच्या गटातील आमदारांनी स्पष्ट इशारा दिला होता की आता मागणी नाही तर संघर्ष होईल. पायलट यांच्या या मागण्या निव्वळ राजकीय असल्याचे काँग्रेस सरकारने स्पष्ट केले होते. प्रभावी सुखजिंदर सिंह रंधावा म्हणाले, की पायलट यांनी मागील भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराच्याा प्रकरणाबाबत कोणतेही पुरावे दिले नाहीत. तसेच त्यांनी हा मु्द्दा काँग्रेसच्या बैठकीतही उपस्थित केला नाही.

Tags

follow us