Download App

‘थोडं थांबा, पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल’; माजी लष्करप्रमुखांचा दावा

POK News : पाकव्याप्त काश्मीर (POK) भारतात कधी सामील होईल असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या मु्द्द्यावर विरोधकांकडूनही सरकारची कोंडी केली जाते. आता केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्हीके सिंह (VK Singh) यांनी पीओकेबाबत मोठे वक्तव्य केले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. भाजपाच्या परिवर्तन संकल्प यात्रेनिमित्त सिंह राजस्थानात आल होते. येथील एका कार्यक्रमात सिंह यांना पत्रकारांनी पीओकेमधील लोक भारतात विलीन होण्याची मागणी करत आहेत. या मुद्द्यावर भाजपची काय भूमिका आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर व्हीके सिंह यांनी उत्तर दिले.

Maratha Reservation चा हिरो झळकणार पडद्यावर; जरांगेंच्या चित्रपटाचं पोस्टर लाँच…

सिंह म्हणाले, पीओके (Pak Occupied Kashmir) आपोआप भारतात विलीन होईल यासाठी तुम्हाला थोडी वाट पहावी लागेल. नवी दिल्लीत पार पडलेल्या जी 20 परिषदेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. भारतात ज्या प्रकारे जी 20 चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या माध्यमातून भारताने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. कोणत्याही देशाने विचार केला नसेल की भारताकडून अशा पद्धतीने एखाद्या जागतिक परिषदेचे आयोजन केले जाईल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताने हे कर्तुत्व सिद्ध केले आहे, असे सिंह म्हणाले.

पीओकेत काय घडलं?

काश्मिरी कार्यकर्ते यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असल्याचे म्हटले आहे. पीओकेतील शहरे आणि गावांमधील लोक अन्न टंचाई, महागाई, उच्च करांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. संपूर्ण प्रदेशात होत असलेल्या या निषेधासाठी पाकिस्तानला जबाबदार धरण्यात येत आहे.

 

Tags

follow us