Download App

राम मंदिर सोहळा, शंकराचार्य अन् विरोध; जाणून घ्या हिंदू धर्मातील महत्त्व

  • Written By: Last Updated:

Shankaracharya Importance In Hindu Religion : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरात जोरदार तयारी केली जात आहे. या सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टकडून देशभरातील ज्येष्ठ मान्यवर आणि संतांना निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाची तारीख, यजमान त्याचबरोबर मंदिराचं अर्धवट असलेलं बांधकाम यावरून शंकराचार्यांनी (Shankaracharya) विरोध केला आहे. त्यामुळे उद्घाटनापूर्वी नव्या चर्चांनी डोकं वर काढलं आहे. विरोध करणारे हे शंकराचार्य कोण आहेत आणि त्यांचे महत्त्व काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा.

अयोध्या ते काळाराम मंदिर! ठाकरेंच्या नव्या खेळीने भाजपाच्या पॉलिटिक्सवर कडी

कोण आहेत शंकराचार्य?

शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च धर्मगुरूचे पद असून, हिंदू धर्मात शंकराचार्यांना आदराने आणि श्रद्धेने पाहिले जाते. आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचारासाठी चार मठांची स्थापना केली होती. ज्यात कर्नाटकातील शृंगेरी मठ, पुरी ओडिसा येथील गोवर्धन मठ, द्वारका गुजरात येथील शारदा मठ आणि उत्तराखंडातील ज्योतिर्मठ यांचा समावेश आहे. या मठांची जबाबदारी संभाळणाऱ्या प्रुमख व्यक्तीला शंकराचार्य असे म्हटले जाते.

रामाच्या अयोध्येत आलात मग, रिकाम्या हातानं जायचं नाही; पाहुण्यांना मिळणार अनोखी भेट

देशाचे प्रमुख शंकराचार्य कोण?

आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचारासाठी चार मठांची स्थापना केली होती. हे चारही मठ ओडिसा, गुजरात, उत्तराखंड आणि कर्नाटक येथे आहेत. पुरी ओडिसा येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज, द्वारका गुजरात येथील शारदा मठाचे शंकराचार्य सदानंद महाराज, उत्तराखंडातील बद्रिका ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुकेश्‍वरानंद महाराज तर, कर्नाटकातील शृंगेरी मठाचे शंकराचार्य भारततीर्थ महाराज आहेत. या चौघांनीही अयोध्येतील सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिंदेच्या दमदार आवाजात ‘प्रभू श्रीराम’ गाणं

गोवर्धन मठ, ओडिशा

ओडिशाच्या पुरीमध्ये गोवर्धन मठ स्थित असून, या मठातील भिक्षूंच्या नावानंतर‘अरण्य’ संप्रदायाचे नाव लावले जाते. या मठात ‘ऋग्वेद’ ठेवण्यात आला आहे. गोवर्धन मठाचे पहिले मठाधिपती पद्मपद आचार्य हे आदि शंकराचार्यांचे पहिले शिष्य होते. सध्या निश्चलानंद सरस्वती हे या मठाचे शंकराचार्य आहेत. अयोध्येतील राम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शास्त्रानुसार केली जात नाहीये. त्यामुळे या कार्यक्रमाला जाणे योग्य ठरणार नसल्याचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

शारदा मठ, गुजरात

शारदा मठ गुजरातमधील द्वारकाधाम येथे स्थित आहे. या मठातील भिक्षूंच्या नावानंतर तीर्थ किंवा आश्रम असे लावले जाते. या मठामध्ये ‘सामवेद’ ठेवण्यात आला आहे. शारदा मठाचे पहिले मठाधिपती हस्तमालक (पृथ्वीधर) होते. सध्या सदानंद सरस्वती हे शारदा मठाचे शंकराचार्य आहेत. अयोध्येतील सोहळा वेद, धर्मग्रंथ आणि धर्माच्या प्रतिष्ठेचे पालन करून व्हावा, अशी आमची इच्छा असल्याचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.

http://Ram Mandir चं उद्घाटन अन् गर्भवती मातांची अनोखी मागणी; अयोध्येतील अजब प्रकार

ज्योतिर्मठ, उत्तराखंड

उत्तराखंडातील बद्रिकाश्रम येथे ज्योतिर्मठ स्थित असून, या मठामध्ये अथर्ववेद ठेवलेला आहे. या मठाचे पहिले मठाधिपती त्रोटकाचार्य होते. सध्या स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे या मठाचे शंकराचार्य असून, ज्योतिर्मठात असणाऱ्या भिक्षूंच्या नावानंतर येथे सागर या शब्दाचा प्रयोग केला जातो. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळेवरून प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच हा कार्यक्रम शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याचेही अधोरेखित केले आहे. मंदिराचे बांधकाम पूर्ण नसतानादेखील अशा प्रकारचा सोहळा आयोजित करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शृंगेरी मठ, कर्नाटक

कर्नानाटकातील रामेश्वरम येथे शृंगेरी मठ स्थित असून, या मठामध्ये यजुर्वेद ठेवण्यात आला आहे. मठाधिपती आचार्य सुरेशवराचार्य हे या मठाचे पहिले शंकराचार्य होते. या मठातील भिक्षूंच्या नावांमागे सरस्वती किंवा भारती असा शब्दप्रयोग केला जातो. सध्या जगद्गुरू भारतीतीर्थ हे या मठाचे शंकराचार्य आहेत.

शिक्षण MBA पण, मूर्ती कलेतच शोधलं करिअर; मंदिर गर्भगृहासाठी मूर्ती कोरणारे अरुण योगीराज कोण ?

कशी केली जाते शंकराचार्यांची निवड?

शंकराचार्य पदावर बसणाऱ्या व्यक्तीला त्यागी, दंडी संन्यासी, संस्कृत, चतुर्वेद, वेदांत ब्राह्मण, ब्रह्मचारी आणि पुराणांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासोबतच त्यांच्या गृहस्थ जीवनात मुंडन, पिंड दान आणि रुद्राक्ष धारण करणे खूप महत्वाचे मानले जाते. शंकराचार्य होण्यासाठी चारही वेद आणि सहा वेदांगांचे ज्ञान असण्याबरोबरच ब्राह्मण असणे अनिवार्य आहे. शंकराचार्य होण्यासाठी आखाड्यांचे प्रमुख, आचार्य महामंडलेश्वर, प्रतिष्ठित संत आणि काशी विद्वत परिषदेची मान्यता आवश्यक असते. यानंतरच शंकराचार्य पदावर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते.

Chandrakant Sompura : भव्य राम मंदिराचं निर्माण करणारे वास्तुविशारद

follow us