Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी राज्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून मद्यविक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच राम मंदिर सोहळ्याला योगींनी राष्ट्रीय सण घोषित केला आहे.
IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीचं रेटिंग आलं समोर, सर्वात लहान कसोटी सामना ठरल्यानंतर प्रश्न…
दरम्यान, येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा प्राणपप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील बड्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं असून या दिवशी आता उत्तर प्रदेशात सार्वजनिक सुट्टीदेखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राम मंदिर सोहळा राष्ट्रीय सणासारखाच साजरा केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
Rajasthan Elections: नवीन वर्षात भाजपला मीठाचा खडा, 10 दिवसांतच द्यावा लागला मंत्र्याला राजीनामा
अयोध्येला गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज श्री राम लल्ला आणि हनुमान गढीचे दर्शन आणि पूजन केल्यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मकर संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या वैदिक विधीची माहिती घेत मुख्यमंत्र्यांनी तीर्थक्षेत्र ट्रस्टला समारंभाच्या सुरक्षा व इतर व्यवस्थेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
यानंतर आयुक्तांनी सभागृहात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या. ते म्हणाले की, अभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या मान्यवरांना अयोध्येत चांगला आदरातिथ्य मिळायला हवे. प्रत्येक व्हीव्हीआयपीच्या विश्रांतीची जागा आधीच निवडली पाहिजे. हवामानाचा विचार करता काही पाहुणे एक-दोन दिवस आधी येण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत त्यांच्या राहण्याची अधिक चांगली व्यवस्था करावी,असं योगींनी स्पष्ट केलं आहे.
येत्या 20 ते 24 जानेवारी 2024 च्या दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी सहभागी होऊ होणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. येत्या 20 जानेवारी रोजी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात प्रभू श्रीरामांची मूर्ति मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली जाणार आहे.