महाकुंभातील मृतांची संख्या लपविण्यासाठी हिंदुंचे मृतदेह भट्टीत दहन; योगींवर आंबेडकरांचे टीकास्त्र

महाकुंभातील मृतांची संख्या लपविण्यासाठी हिंदुंचे मृतदेह भट्टीत दहन; योगींवर आंबेडकरांचे टीकास्त्र

Prakash Aambedkar on Yogi Aadityanath for Mahakumbh stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ (Mahakumbh) सुरू आहे. तेथे मंगळवारी 28 जानेवारीला रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून भाजप आणि योगी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यात आता प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारला आहे.

‘जयंत पाटील नीच अन् कपटी माणूस, टप्प्यात आणून कार्यक्रम..’; भाजप नेत्याची जहरी टीका

आंबेडकर म्हणाले की, महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या 1000 पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे.

भाजपाच्या लाटेत दिग्गज भुईसपाट! केजरीवाल, सिसोदियांचा पराभव; ‘आप’ला मोठा धक्का

आंबेडकर म्हणाले की, महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या उत्तर प्रदेश प्रशासनाने खोटी सांगितली आहे; योगी आदित्यनाथ यांनी केलेले हे सर्वात मोठे कव्हर-अप आहे. मृत भाविकांची संख्या लपविण्यासाठी, योगी आदित्यनाथ यांनी भाविकांचा मृतदेह हिंदू रीती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार न करता भट्टीत दहन केले आहे.

Delhi Election Results : मोठी बातमी! दिल्लीत मुख्यमंत्री आतिशी विजयी तर सत्येंद्र जैन पराभूत

आंबेडकरांनी या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारले. ज्यामध्ये ते म्हणाले की, योगी आदित्यनाथ, या १००० हून अधिक भाविकांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात की पंतप्रधान मोदी? योगी आदित्यनाथ, या १००० हून अधिक मृत भाविकांच्या कुटुंबियांना तुम्ही काय उत्तर द्याल? कोणीतरी तिचा नवरा गमावला आहे, कोणीतरी तिचा भाऊ गमावला आहे तर कोणीतरी तिचा बाप गमावला आहे! तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल? योगी आदित्यनाथ, हिंदू विधी न पाळता त्यांच्या हिंदू भक्तांचे मृतदेह भट्टीत का जाळले?

एखाद्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करणे किती महत्त्वाचे आहे, हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. योगी आदित्यनाथ यांनी खोटे बोलून आणि हिंदू विधी न पाळता त्यांचे मृतदेह भट्टीत जाळून 1000 हून अधिक हिंदू भाविकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना फसवले असल्याचेही ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube