IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीचं रेटिंग आलं समोर, सर्वात लहान कसोटी सामना ठरल्यानंतर प्रश्न…

IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीचं रेटिंग आलं समोर, सर्वात लहान कसोटी सामना ठरल्यानंतर प्रश्न…

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये (Cape Town)खेळला गेला. तो कसोटी सामना दीड दिवसही चालला नाही. सामना 107 षटकांमध्येच संपल्यानंतर खेळपट्टीवरच (pitch)प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लहान कसोटी सामना (Shortest Test Match)मानला गेला. आत्तापर्यंत कोणत्याही सामन्यात एवढ्या कमी षटकांमध्ये कोणत्याही टीमचा विजय आणि पराजय झालेला नव्हता. आत्ता त्या खेळपट्टीचे रेटिंग समोर आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) न्यूलँड्स क्रिकेट मैदानाची खेळपट्टी असमाधानकारक असल्याचे घोषित केले आहे.

Nashik Loksabha : ‘मविआ’मध्ये ठाकरेंची मोर्चेबांधणी अन् पवारांचीही चाचपणी | LetsUpp Marathi

आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी न्यूलँड्स खेळपट्टीबाबत आपला अहवाल सादर केला आहे. यामुळे सामना अधिकार्‍यांची चिंता वाढली आहे. आणि मूल्यांकनानंतर केपटाऊनमधील न्यूलँड्स खेळपट्टी असमाधानकारक मानली गेली आहे. त्यांच्या अहवालात म्हटलंय की, न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप कठीण होते. संपूर्ण सामन्यात चेंडू पटकन आणि काहीवेळा धोकादायक पद्धतीने उसळी घेत होता. त्यामुळे शॉट्स खेळणे देखील कठीण झाले. सामन्यादरम्यान चेंडू अनेक फलंदाजांच्या ग्लोव्हजला लागला आणि चेंडूच्या असमान उसळी घेण्यामुळे विकेटही पटापट पडल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

डॉक्टरांच्या वेड्या वाकड्या अक्षरावर HC नाराज; PM रिपोर्टसह सर्व गोष्टी कॅपिटलमध्ये लिहिण्याचे आदेश

आयसीसीचा नियम काय आहे?
आयसीसीच्या खेळपट्टी आणि आऊटफिल्ड निरीक्षण प्रक्रियेअंतर्गत, खेळपट्टी किंवा आऊटफिल्ड निकृष्ट दर्जाचे असल्याचे घोषित केल्यास, त्या ठिकाणाला काही डिमेरिट गुण दिले जातात. सामनाधिकारी ज्या खेळपट्ट्या आणि आउटफिल्ड असमाधानकारक आहेत अशांना एक डिमेरिट पॉइंट दिला जातो. जर एखाद्या ठिकाणाचे सहा डिमेरिट गुण झाले तर त्याला 12 महिन्यांसाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन करण्यापासून निलंबित केले जाते.

12 डिमेरिट गुणांच्या बाबतीत, 24 महिन्यांपर्यंत बंदी आहे. हे गुण सतत पाच वर्षांसाठी वैध असतात. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडे बंदीविरोधात अपील करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी असतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज